अमरावती जिल्ह्यातील विवाहितेच्या हत्येप्रकरणी अकोल्यातील प्रियकरास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 03:24 PM2018-07-23T15:24:55+5:302018-07-23T15:30:57+5:30
अकोला - अकोल्यातील मोठी उमरी परिसरात माहेर असलेल्या एका २२ वर्षीय महिलेची अमरावती जिल्हयातील मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गळा चिरुन व दोरीने आवळून हत्या करणाऱ्या अकोल्यातील हरीहर पेठेतील आरोपीस स्थानीक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली.
अकोला - अकोल्यातील मोठी उमरी परिसरात माहेर असलेल्या एका २२ वर्षीय महिलेची अमरावती जिल्हयातील मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गळा चिरुन व दोरीने आवळून हत्या करणाऱ्या अकोल्यातील हरीहर पेठेतील आरोपीस स्थानीक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. या आरोपीचे महिलेसोबत तीच्या विवाहानंतरही प्रेमसंबध असल्याची माहिती असून तीने लग्णासाठी तगादा लावल्याने तीची हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे.
मोठी उमरीतील आवस्ती प्लॉट येथील रहिवासी संगीता गजानन मोरे यांची मुलगी प्रीया हीचा विवाह अमरावती जिल्हयातील ललीत महाजन यांच्याशी झाला होता. मात्र विवाहानंतरही प्रीया ललीत महाजन ही तीचा लग्णाआधीचा प्रीयकर सागर उर्फ प्रेम दिपक बरगट (२३) रा. हरीहर पेठ याच्या संपर्कात होती. तीने सागरला लग्ण करण्यासाठी तगादा लावला. त्याने विरोध केला असता महिलेने त्याचा मानसीक छळ सुरु केला होता, अशी कबुली आरोपीने पोलिसांनासमोर दिली. त्यामूळे प्रीया महाजन हीच्यापासून सुटका करण्यासाठी त्याने २३ एप्रिल २०१८ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास प्रीयाला मोर्शी रोडवर दुचाकीने नेले. त्यानंतर निंबी गावाजवळ प्रीयाचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तीच्या गळयावर काचेच्या तुकडयाने वार केले. तीची ओळख पटू नये म्हणूण चेहºयावर व अंगावर रॉकेल टाकून जाळून टाकले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास शिरखेड पोलिसांनी सुरु केला असता अकोला स्थानीक गुन्हे शाखेला माहिती दिली. या माहितीच्या आधारे सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता प्रकरणातील महिलेच्या आईला तीचे दागीने व छायाचित्र दाखवीले असता मृतक महिलेच्या आईने तीची मुलगी असल्याची ओळख दिली. त्यानंतर महिलेच्या कॉल डीटेल्सवरुन व तीचे प्रेमसंबधावरुन हरीहर पेठेतील रहिवासी सागर बरगट याला स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याने पोलिसांसमोर हत्याकांडाची कबुली दिली. त्यानंतर आरोपीस शिरखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखेचे प्रमूख क ैलास नागरे, पीएसआय रणजीतसिंह ठाकूर, शक्ती कांबळे, अमीत दुबे, मनोज नागमते, शंकर डाबेराव, भावलाल हेंबाडे, संदीप ताले यांनी केली.