तरुणीच्या हत्येप्रकरणी युवकाला अटक,

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 10:56 PM2018-10-17T22:56:55+5:302018-10-17T22:57:05+5:30

विशाल नगरात राहणाऱ्या अपूर्वा अनंतराव यादव (१९) या तरुणीचा मंगळवारी दुपारी राहत्या घरी धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेतील एका संशयित युवकाला लातूर पोलिसांनी बुधवारी पहाटे अटक केली

Youth arrested for murder of teenager | तरुणीच्या हत्येप्रकरणी युवकाला अटक,

तरुणीच्या हत्येप्रकरणी युवकाला अटक,

Next

लातूर  - विशाल नगरात राहणाऱ्या अपूर्वा अनंतराव यादव (१९) या तरुणीचा मंगळवारी दुपारी राहत्या घरी धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेतील एका संशयित युवकाला लातूर पोलिसांनी बुधवारी पहाटे अटक केली आहे. 
कर्नाटक राज्यातील जमखंडी-बागलकोट येथे वैद्यकीय शिक्षण घेणारी अपूर्वा अनंतराव यादव ही तरुणी सुट्यानिमित्त लातुरातील घरी आली होती. दरम्यान, मंगळवारी वडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. तर आई सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत देवदर्शनासाठी बाहेर गेल्या होत्या. दरम्यान, अपूर्वा ही घरात एकटीच असल्याची संधी साधून मारेकºयाने घरात घुसून तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ती मरण पावली. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, शहर उपाधीक्षक हिंमत जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनेच्या तपासासाठी चार स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती. या खून प्रकरणी विशाल नगरातच राहणा-या अमर व्यंकटराव शिंदे (२०) याला राहत्या घरातून पोलीस पथकाने बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले, अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी दिली. 
पथकात गुन्हे शाखेचे पोनि. सुधाकर नागरगोजे, सपोनि. सुधाकर बावकर, सुनील रेजितवाड, पोना. नामदेव पाटील, बालाजी जाधव, खुर्रम काझी, विनोद चिलमे, रवि गोंदकर, राजेंद्र टेकाळे, यशपाल कांबळे, भागवत कठारे, गोविंद जाधव, नागनाथ जांभळे यांच्यासह सायबर सेलचे संतोष देवडे, राजेश कंचे, गणेश साठे, रियाज सौदागर, अमोल वाघमारे यांचा समावेश होता.

Web Title: Youth arrested for murder of teenager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.