धक्कादायक! स्वत:चा गळा चिरुन तरुणाने मारली इमारतीवरुन उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 10:21 AM2020-09-15T10:21:14+5:302020-09-15T10:22:51+5:30
राहुल विश्रांतवाडीला आपल्या पत्नीसमवेत राहत होता. लॉकडाऊनच्या काळात त्यांची पत्नी गावी गेली असल्याने राहुल एकटाच राहत होता.
पुणे - एका तरुणाने स्वत: च्या अंगावर वार करुन गळा चिरुन घेऊन इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. राहुल रामा सूर्यवंशी (वय ३२, रा़ कस्तुरभा सोसायटी, विश्रांतवाडी, मुळ गाव दगडवाडी, ता. निलंगा, जि. लातूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री घडली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, राहुल विश्रांतवाडीला आपल्या पत्नीसमवेत राहत होता. लॉकडाऊनच्या काळात त्यांची पत्नी गावी गेली असल्याने राहुल एकटाच राहत होता. तो नो पार्किंगमधील वाहनांचे लोड, अनलोड करण्याचे काम करीत होता. रविवारी त्याने घरामध्ये स्वत:चा गळा चिरुन घेतला. शरीरावर सर्वत्र जखमा करुन घेतल्या. तरीही जीव जात नसल्याने त्याने इमारतीवरुन उडी मारली. या घटनेची माहिती मिळाल्यावर विश्रांतवाडी पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. विश्रांतवाडी पोलीस तपास करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
तरुणांसाठी सुवर्णसंधी! 'ही' ई-कॉमर्स कंपनी देणार तब्बल एक लाख लोकांना नोकरी
जय जिजाऊ, जय शिवराय! योगी सरकारच्या 'त्या' निर्णयावर फडणवीसांचं खास ट्विट, म्हणाले...
"मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जातोय"
"बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान सुरू, हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही"
"कोरोनामध्ये आत्मनिर्भर व्हा, स्वतःचा जीव स्वतःच वाचवा कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत"