मध्यरात्री शेजारील महिलेच्या घरात घुसला युवक; रक्तबंबाळ होऊन माघारी परतला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 09:38 PM2021-06-15T21:38:45+5:302021-06-15T21:39:19+5:30
Attempt to Murder : आवाज ऐकून आजूबाजूचे लोकही जमले आणि त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथील झांघा भागातील दुबौली गावात रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास महिलेने शेजारच्या युवकावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर रक्तबंबाळ तरुण गोंगाट करीत गच्चीवर पोहोचला. आजूबाजूच्या लोकांनी दिलेल्या माहितीपर्यंत पोहोचलेल्या पोलिसांनी महिलेला अटक केली.
पोलिसांनी महिलेविरूद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आणि सोमवारी तिला न्यायालयात हजर केले असता तिथून तिला तुरूंगात पाठविण्यात आले आहे. जखमीला वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या शेजारच्या युवकाने बलात्काराच्या इराद्याने घरात प्रवेश केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झांझाच्या दुबौली गावात राहणाऱ्या रंचना नावाची महिला उमालाल चौहान (40) याच्या शेजारी राहते. असे सांगितले जात आहे की, यापूर्वीही दोघांत चांगले संबंध होते. काही बाबतीत दोघांमध्ये वाद झाला. आरोपी महिला रचनाचा नवरा नरेंद्र बाहेरगावी राहतो. यामुळे ती घरी एकटी राहते आणि स्वत: च्या बचावासाठी उशीच्या खाली चाकू घेऊन दररोज झोपी जाते. रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास शेजारी उमालाल हे गच्चीवरून त्यांच्या घरात घुसले. आवाजाने रंजना जागी झाली आणि चाकूने वार केले. रक्तबंबाळ उमालाल ओरडला आणि गच्चीवर जाऊन आरडाओरडा करू लागला. रात्रीचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकही जमले आणि त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रंचना घरातून पळून गेली होती, मात्र त्यानंतर पोलिसांनी तिला शोधल्यानंतर अटक केली. जखमीचा पुतण्या प्रशांत याच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
NIA कोर्टाने तिघांना सुनावली १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा तर दोघांना केले निर्दोष मुक्त https://t.co/s8wn9eRto1
— Lokmat (@MiLOKMAT) June 15, 2021
दुसरीकडे, रंचना सांगते की, उमालाल तिच्यावर बलात्कार करण्याच्या उद्देशाने त्यांच्या घरात घुसला होता. घटनेमागील खरे कारण स्पष्ट करता आले नाही. एसएचओ संजय मिश्रा म्हणाले की, खरे कारण शोधले जात आहे. खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला तुरूंगात पाठविण्यात आले आहे. चाकू ताब्यात घेण्यात आला आहे. घशाच्या तीव्र जखमामुळे उमालाल यांच जबाब नोंदवले जाऊ शकले नाही. उमालाल कंत्राटी वीज कर्मचारी आहे. तो तीन मुलांचा पिता आहे. घटनेच्या वेळी पत्नी आणि मुले घरात झोपली होती.
संतापलेल्या पत्नीने पतीला बदडून काढत घेतली पोलीस ठाण्यात धाव; पोटच्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्नhttps://t.co/QJPocTxNAj
— Lokmat (@MiLOKMAT) June 15, 2021