ईदच्या दिवशी तरुणाची निर्घृण हत्या, ५ संशयितांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 01:07 PM2020-05-26T13:07:43+5:302020-05-26T13:09:37+5:30

त्यांना आज न्यायालया पुढे हजर केले असता पोलीस कस्टडी मिळाली आहे. 

Youth brutally murdered on Eid day, 5 suspects arrested pda | ईदच्या दिवशी तरुणाची निर्घृण हत्या, ५ संशयितांना अटक

ईदच्या दिवशी तरुणाची निर्घृण हत्या, ५ संशयितांना अटक

Next
ठळक मुद्देईदच्या दिवशी कल्याण वालधुनी येथील रहीम अब्द्दुल कुरेशी, सुलेआम उर्फ जाहिद अब्द्दुल शेख, राहुल राजेंद्र जाधव, शाहीद अजीज शेख व शादाब शेख आदी जन मोटार सायकलवरून फिरायला गेले होते.सोमवारी सकाळी खूनाचा प्रकार उघड झाल्यावर हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ५ ते ६ जणावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

उल्हासनगर : मलंगवाडी परिसरात रविवारी मध्यरात्री १ वाजता फिरण्यासाठी गेलेल्या ५ मित्रा पैकी एकाची एका टोळक्याने दगडाने ठेचून व धारदार शस्त्राने वार करून निर्घुण खून केला. तसेच इतरांना मारहाण करून पिटाळून लावले असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

पोलिसानी ५ संशयिताना अटक केली. उल्हासनगर हिललाईन पोलीस हद्दीतील मलंगवाडी परिसरात रविवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान व ईदच्या दिवसी कल्याण वालधुनी येथील रहीम अब्द्दुल कुरेशी, सुलेआम उर्फ जाहिद अब्द्दुल शेख, राहुल राजेंद्र जाधव, शाहीद अजीज शेख व शादाब शेख आदी जन मोटार सायकलवरून फिरायला गेले होते. त्यावेळी मलंगवाडी बस स्टोप येथे बसलेल्या एका टोळक्याने त्याने हटकून त्यांची अंगझडती घेणे सुरु केली. मात्र शादाब शेख याने अंगझडती घेण्याला विरोध केल्याने त्यापैकी तिघांनी त्याला बाजूला नेऊन दगडाने ठेचून व धारदार शस्त्राने वार करून निर्घुण खून केला. तर इतराना धमकी व मारहाण करून पिटाळून लावले.

 
सोमवारी सकाळी खूनाचा प्रकार उघड झाल्यावर हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ५ ते ६ जणावर खुनाचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी तपासाची चक्र फिरून मलंगवाडी येथील संशयित ५ जणांना अटक केल्याची माहिती तपास अधिकारी खंडारे यांनी दिली. त्यांना आज न्यायालया पुढे हजर केले असता पोलीस कस्टडी मिळाली आहे. 

Web Title: Youth brutally murdered on Eid day, 5 suspects arrested pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.