प्रेयसीच्या लहान बहिणीने लावला रेपचा आरोप, तरूणाने गळफास लावून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 11:40 AM2022-02-25T11:40:04+5:302022-02-25T11:40:24+5:30
Uttar Pradesh : मृतकाच्या कुटुंबियांनी त्याच्या प्रेयसीसोबतच पाच लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तरूण मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) औरैयामध्ये आत्महत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका २८ वर्षाय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवला आणि चौकशी सुरू केली. मृतकाच्या कुटुंबियांनी त्याच्या प्रेयसीसोबतच पाच लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तरूण मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
तरूणाच्या आत्महत्येची चौकशी करत असलेल्या पोलिसांना धक्कादायक तथ्य सापडले. मृतकाचं नाव अनुज होतं आणि त्याच्या विरोधात पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल केला गेला होता. पोलिसांनी सांगितलं की, आत्महत्येच्या दोन दिवसांआधी मृतकाच्या प्रेयसीने त्याच्यावर तिच्या लहान बहिणीवर रेप केल्याचा गुन्हा दाखल केला होता. सोबतच मृतकाचा मोठा भाऊ आणि वहिनीवर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
मृतकाच्या कुटुंबियांचा आऱोप आङे की, प्रॉपर्टीसाठी त्यांच्या मुलाला रेपच्या केसमध्ये अडकवण्यात आलं होतं. याला वैतागून त्याने आत्महत्या केली. मृतकाच्या बहिणीने पोलिसांना सांगितलं की, एकता नावाची तरूणी तिच्या भावावर त्याची प्रॉपर्टी आपल्या नावावर करण्यासाठी ब्लॅकमेल करत होती. दोन दिवसांआधीच तो आत्महत्या करण्याचा विचार करत होता. पण मी त्याला समजावलं होतं. मात्र, नंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला. माझ्या भावाची हत्या झाली आहे.
याप्रकरणी माहिती देत एसपी शिष्यपाल सिंहने सांगितलं की, ही घटना बिधूनामधील आहे. सूचना मिळाली होती की, एका तरूणाचा मृतदेह झाडाला लटकलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मृतदेह ताब्यात घेतला आणि चौकशी सुरू केली. लवकरच प्रकरणाचं सत्य समोर येईल.