प्रेयसीच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 08:26 PM2019-04-01T20:26:12+5:302019-04-01T20:28:33+5:30

पैशांची मागणी : आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

Youth commits suicide due to love affair | प्रेयसीच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या

प्रेयसीच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस सूत्रानुसार २ मार्च रोजी पहाटे ६.३० वाजताच्या सुमारास लखन दिनकर काळे (२९, रा. सायत) हा शिवारात विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला होता. लखनचे घराजवळील एक तरुणीशी प्रेमसंबंध होते. ती तरुणी लखनला वारंवार फोन करून मानसिक त्रास देत पैशांची मागणी करीत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले.

अमरावती - प्रेयसीने फोनवरून वारंवार पैशांची मागणी करून मानसिक त्रास दिल्याने एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब पोलीस चौकशीत पुढे आली आहे. याप्रकरणात भातकुली पोलिसांनी एका तरुणीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. 

पोलीस सूत्रानुसार २ मार्च रोजी पहाटे ६.३० वाजताच्या सुमारास लखन दिनकर काळे (२९, रा. सायत) हा शिवारात विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला होता. लखनला वडील दिनकर यांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. ५ मार्च रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात शहर कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून हे प्रकरण पुढील तपासकामी भातकुली पोलिसांच्या स्वाधीन केले. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पंकज दाभाडे यांनी नातेवाइकांचे जबाब नोंदविले. 
लखनचे घराजवळील एक तरुणीशी प्रेमसंबंध होते. ती तरुणी लखनला वारंवार फोन करून मानसिक त्रास देत पैशांची मागणी करीत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. पोलिसांनी मृताच्या मोबाइलचा सीडीआर काढला असता त्यामध्ये व्हॉट्स-अ‍ॅपवर लखन व त्या तरुणीचे चॅटिंग आढळून आले. तपासानंतर लखनला तरुणीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी तरुणीविरुद्ध भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Youth commits suicide due to love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.