युवकाने उडी मारून केली आत्महत्या; मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 08:37 PM2021-03-16T20:37:18+5:302021-03-16T20:41:50+5:30

Suicide Case : याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Youth commits suicide by jumping; trying to identify the death body begin | युवकाने उडी मारून केली आत्महत्या; मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु 

युवकाने उडी मारून केली आत्महत्या; मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु 

Next
ठळक मुद्देअचानक पुलाच्या मध्यभागी आल्यावर त्याने नदीपात्रात उडी घेतली. ही घटना त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने बघितली. खिशात केवळ एक साधा मोबाईल सापडला असून त्याच्या डाव्या हातावर इंग्रजी S  तर उजव्या हातावर डमरूचे चित्र गोंदलेले आहे.

येरवडा - येरवड्याच्या पुलावरून एका युवकाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनोळखी तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. आत्महत्या करणाऱ्या युवकाची ओळख पटू शकलेली नाही. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 
 मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अंदाजे 35 वर्षाचा एक युवक डॉ. आंबेडकर सेतूवरून येरवडयाच्या दिशेने पायी चालला होता. अचानक पुलाच्या मध्यभागी आल्यावर त्याने नदीपात्रात उडी घेतली. ही घटना त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने बघितली. त्याने तात्काळ या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळवली. नदीपात्रातून थोड्याच अंतरावर वाहत जात नवीन मेट्रोच्या पुलाखाली एका खडकालगत त्याचा मृतदेह अडकून तरंगत होता. 

 

येरवडा अग्निशमन दलाचे तांडेल महेश मुळीक, मिलिंद रावतू, रोहिदास टिंगरे, चालक गणेश पराते यांच्या पथकाने नदीपात्रात उतरून दोरीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता त्याची ओळख पटू शकलेली नाही. त्याच्या खिशात केवळ एक साधा मोबाईल सापडला असून त्याच्या डाव्या हातावर इंग्रजी S  तर उजव्या हातावर डमरूचे चित्र गोंदलेले आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात रवाना करण्यात आला असून या प्रकरणी येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पुढील तपास येरवडा पोलिस करत आहेत. दरम्यान नदीपात्रात उडी मारलेल्या अनोळखी तरुणाला पाहण्यासाठी डॉ.आंबेडकर सेतूवर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

Web Title: Youth commits suicide by jumping; trying to identify the death body begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.