पोलिसांच्या हप्तेखोरीला कंटाळून तरुणाने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 05:45 PM2019-05-03T17:45:22+5:302019-05-03T17:46:30+5:30

सतीश खेडकर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

Youth committed suicide due to police apathy | पोलिसांच्या हप्तेखोरीला कंटाळून तरुणाने केली आत्महत्या 

पोलिसांच्या हप्तेखोरीला कंटाळून तरुणाने केली आत्महत्या 

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी छळ केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांकडून करण्यात येत असून मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. सतीशचे ज्युसचे दुकान होते. मात्र दोन पोलिसांकडून हप्त्यासाठी नेहमी तगादा लावण्यात येत होता.

ठाणे - उल्हासनगर येथे दोन पोलिसांच्या जाचाला वैतागून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी छळ केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांकडून करण्यात येत असून मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. सतीश खेडकर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

सतीशचे ज्युसचे दुकान होते. मात्र दोन पोलिसांकडून हप्त्यासाठी नेहमी तगादा लावण्यात येत होता. अखेर पोलिसांच्या या नाहक त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. यानंतर त्याच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त करत पोलीस ठाण्याच्या समोर पाच तास ठिय्या आंदोलन केले. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मोठा संख्येने नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थिती लावून ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत संबंधित पोलिसांवर कारवाई होत नाही. तोपर्यंत नातेवाईकांनी सतीशचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत ठिय्या आंदोलन केले.ठिय्या आंदोलनानंतर पोलिसांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलीस उपायुक्तांनी सतीशच्या नातेवाईकांशी चर्चा करुन संबंधित प्रकरणातील दोषी पोलिसांवर चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title: Youth committed suicide due to police apathy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.