कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाचा मृत्यू, ५ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 10:36 PM2023-05-26T22:36:19+5:302023-05-26T22:36:31+5:30

शवविच्छेदनाच्या आधारे पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून ५ जणांना अटक केली आहे.

Youth dies in Kasturba police station, 5 arrested | कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाचा मृत्यू, ५ जणांना अटक

कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाचा मृत्यू, ५ जणांना अटक

googlenewsNext

मुंबईतील कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २९ वर्षीय तरुणाचा लोकांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शवविच्छेदनाच्या आधारे पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून ५ जणांना अटक केली आहे.

25 मे रोजी रात्री 1.18 च्या सुमारास पोलीस नियंत्रणाला फोन आला की, शशी सोसायटी, काटर रोड क्रमांक 5 मध्ये चोर पकडला गेला आहे, जो चोरी करण्यासाठी आला होता. काही लोकांनी आणि इमारतीच्या चौकीदाराने मिळून कथित चोरट्याला बेदम मारहाण केली. पोलिस तेथे पोहोचल्यानंतर चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, संबंधिताचे नाव प्रवीण शांताराम लहाने असे आहे. पोलिसांनी त्याला सोसायटीतून थेट रुग्णालयात नेले. तेथे त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. मात्र, रुग्णालयातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

प्रवीणच्या मृत्यूनंतर कस्तुरबा पोलिसांनी काही लोकांविरुद्ध कलम 304(2), 143, 144, 147, 148, 149 IPC, 37 (1) (A), 135 मापोका आणि सोसायटीचे २ वॉचमन यांच्यावर गुन्हा दाखल केला. जोरासिंग जलराम भट्ट, जनक मोतीराम भट्ट आणि स्थानिक रहिवासी हर्षित गांधी, मनीष गांधी आणि हेमंत राम्बिया यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

प्रवीण लहाने हा चोर नसून तो नाशिकचा रहिवासी आहे. दारूच्या नशेत तो सोसायटीत गेला होता, असे तपासात उघड झाले आहे. मृत प्रवीणचा भाऊ प्रकाश लहाने हे मुंबई सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रवीणचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला, तेथून पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर पोलिसांनी 5 जणांना अटक केली.

Web Title: Youth dies in Kasturba police station, 5 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.