लसीकरण केंद्रावर युवकानं घातला जोरदार गोंधळ; व्हिडीओ व्हायरल झाल्यानं आला अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 07:49 PM2021-05-24T19:49:21+5:302021-05-24T19:53:17+5:30
Crime News : अटरू पोलीस ठाण्यात याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
राजस्थानातील बारांच्या अटरू येथील १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण केंद्रात, बंटी तिवारी या तरूणाने अशांतता निर्माण केली आणि सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना धमकावले. या गदारोळाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच अटरू पोलीस ठाण्यात याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मदा धर्मशाळेत लसीकरण सुरु होते, तेव्हा एक तरुण आला आणि त्याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यावेळी त्याला घटनास्थळी हजर असलेल्या महिला परिचारिका व लस समन्वयक शिवराज मीणा यांनी रोखले. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना त्याने असभ्य भाषा वापरली. लसीकरण प्रभारी योगेश तिवारी यांनी ही माहिती विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जे.पी. यादव यांना दिली.
महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; कृषी सहायकावर गुन्हा दाखलhttps://t.co/LTDtiIgSOk
— Lokmat (@MiLOKMAT) May 24, 2021
त्यांनी आमदार पानाचंद मेघवाल आणि उपविभागीय अधिकारी दिनेश मीना यांना माहिती दिली व पोलिस संरक्षण मागितले. एवढेच नव्हे तर बंटी तिवारी याने कोर्टाच्या कर्मचार्यांच्या लसीकरणासाठी तयार केलेली यादी घेतली व ती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून शांतता भंग केल्याच्या कलमान्वये आरोपीला अटक केली आहे.