इस्लामपुरात भरदिवसा बाजारात युवकाचा खून

By अविनाश कोळी | Updated: April 24, 2025 14:35 IST2025-04-24T14:35:22+5:302025-04-24T14:35:55+5:30

इस्लामपूर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी खून झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Youth murdered in Islampur market crime news | इस्लामपुरात भरदिवसा बाजारात युवकाचा खून

इस्लामपुरात भरदिवसा बाजारात युवकाचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरातील अजिंक्य बाजार परिसरात गुरुवारी दुपारी अज्ञातांनी भर दिवसा युवकाचा खून केला.

इस्लामपूर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी खून झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. गुरूवार हा बाजारचा दिवस असतो. रस्त्यावरच बाजार भरतो. त्यामुळे याठिकाणी मोठी वर्दळ असते. अशातच अजिंक्य बझार परिसरात नितिन पालकर या सराईत गुन्हेगाराचा भर गर्दीतच अज्ञातांनी खून केला. मयत नितीन पालकर याला पोलिसांनी मोक्का लावण्यात आल्याची चर्चाही घटनास्थळी होती.

मारेकरी कोण? कोणत्या कारणासाठी खून झाला, याबाबत पोलिस माहिती घेत आहेत. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला. यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती.

Web Title: Youth murdered in Islampur market crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.