नागपुरातील राजाबाक्षा रोडवर युवकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:20 IST2019-11-19T00:18:44+5:302019-11-19T00:20:15+5:30
इमामवाडा परिसरातील राजाबाक्षा रोडवर एका कारमध्ये स्वार असलेल्या युवकाला रोखून अज्ञात आरोपींनी त्याची हत्या केली. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

नागपुरातील राजाबाक्षा रोडवर युवकाची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इमामवाडा परिसरातील राजाबाक्षा रोडवर एका कारमध्ये स्वार असलेल्या युवकाला रोखून अज्ञात आरोपींनी त्याची हत्या केली. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. विजय रमेश खंडाईत (३०) रा. शताब्दी चौक असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विजय आणि त्याचा मित्र यशवंत चव्हाण दोघेही कारने (एमएच ३१/एफए/९५०५) राजाबाक्षा वस्तीतून जात होते. या रोडवर हनुमान मंदिराजवळ दोघांना काही युवकांनी रोखले. त्यांच्यात वाद झाला. यानंतर आरोपींनी विजयवर शस्त्रांनी हल्ला करीत त्याला जखमी केले. यशवंतने मध्यस्ती केली असता त्याच्यावरही हल्ला केला. तेव्हा यशवंत पळाला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. आरोपींनी विजयला घटनस्थळीच संपवले. माहिती मिळताच इमामवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. विजयला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत पोलीस आरोपींचा शोध घेत होते.