हमालाच्या खूनप्रकरणी तरुणाला जन्मठेप, किरकोळ कारणावरुन झाला होता वाद

By दत्ता यादव | Published: April 18, 2023 09:51 PM2023-04-18T21:51:44+5:302023-04-18T21:52:27+5:30

लावालावी करतो म्हणून केला होता खून; जरंडेश्वर कारखान्यातील हमालांमधील वाद

Youth of Beed sentenced to life imprisonment in Hamala's murder case | हमालाच्या खूनप्रकरणी तरुणाला जन्मठेप, किरकोळ कारणावरुन झाला होता वाद

हमालाच्या खूनप्रकरणी तरुणाला जन्मठेप, किरकोळ कारणावरुन झाला होता वाद

googlenewsNext

सातारा : कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर कारखान्यातील हमालाचा कोयत्याने सपासप दहा वार करून खून केल्याप्रकरणी पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांनी आरोपी संतोष रावसो सातपुते (वय २८, रा. नायगाव, ता. पाटोदा, जि. बीड) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे असणाऱ्या जरंडेश्वर कारखान्यामध्ये सोमनाथ कारभारी गोल्हार  (वय ३५, रा. कापशी, ता. आष्टी, जि. बीड) आणि आरोपी संतोष सातपुते हे दोघे हमाल म्हणून काम करत होते. त्यावेळी सोमनाथ गोल्हार हा  सातपुतेला आई-बहिणीवरून शिवीगाळ करत होता. तसेच इतर हमालांमध्ये लावालावी करत होता. त्यामुळे संतोष हा सोमनाथवर चिडून होता. 

३१ डिसेंबर २०१६ रोजी रात्री अकरा वाजता सोमनाथ राहत असलेल्या चाळीत जाऊन संतोषने कोयत्याने त्याच्या गळ्यावर, तोंडावर, मानेवर असे दहा वार करून त्याचा निर्घृण खून केला होता. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात हमाल संतोष सातपुतेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक डी. जी. बागवे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सुनावणीवेळी एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने संतोष सातपुते याला जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सहायक अतिरिक्त सरकारी वकील मिलिंद ओक यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना पोलिस प्राॅसिक्यूशन स्काॅडचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत, पोलिस अंमलदार शमशुद्दीन शेख, गजानन फरांदे, मंजूर मणेर आदींनी सहकार्य केले. 

Web Title: Youth of Beed sentenced to life imprisonment in Hamala's murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.