मुलीस मॅसेज पाठविल्याने एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 12:27 PM2021-06-13T12:27:10+5:302021-06-13T12:27:19+5:30
A youth was beaten for sending a message to girl : मुलीस मोबाईलवर मॅसेज टाकल्याच्या कारणावरून त्यास लोखंडी रॉड व चाकू मारून जखमी करण्यात आल्याची घटना ११ जून रोजी रात्री घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव सराई: शिरपूर येथील एका अल्पवयीन मुलाने एका मुलीस मोबाईलवर मॅसेज टाकल्याच्या कारणावरून त्यास लोखंडी रॉड व चाकू मारून जखमी करण्यात आल्याची घटना ११ जून रोजी रात्री घडली. दरम्यान जखमी मुलावर अकोला येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
याप्रकरणी रायपूर पोलिसांनी शिरपूर येथील दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिरपूर येथील मधुकर हिवाळे यांनी या प्रकरणी रायपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ऋषीकेश हिवाळे या त्यांच्या मुलाने एका मुलीच्या मोबाईलवर मॅसेज टाकल्यामुळे वैभव शेळके आणि गणेश शेळके यांनी त्यास लोखंडी रॉड व चाकूने मारहाण केली.
सोबतच जातीवाचक शिविगाळ केली. अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त दोन्ही आरोपी विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न तथा ॲट्रासिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरणी ठाणेदार सुभाष दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे व अमोल गवई, श्रीकांत चिंचवार यांनी गुन्ह्यातील दोन्ही आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास एसडीपीअेा विलास यामावार हे करीत आहेत. ही घटना ११ जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली होती.