बापरे! शेजाऱ्याच्या बायकोला पळवून नेण्यासाठी युवकाचा 'कारनामा'; चिमुकल्याची बोटे चावली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 07:49 PM2022-03-31T19:49:17+5:302022-03-31T19:50:34+5:30

Crime News : नंतर पीडितेने तिच्या निष्पाप मुलाला उपचारासाठी जेएलएन रुग्णालयात नेले आणि त्याचवेळी क्लॉक टॉवर पोलिस ठाण्यात या संपूर्ण प्रकरणाची तक्रार केली.

Youth's 'act' to run away neighbor's wife; her kid's fingers bit | बापरे! शेजाऱ्याच्या बायकोला पळवून नेण्यासाठी युवकाचा 'कारनामा'; चिमुकल्याची बोटे चावली

बापरे! शेजाऱ्याच्या बायकोला पळवून नेण्यासाठी युवकाचा 'कारनामा'; चिमुकल्याची बोटे चावली

Next

अजमेर : राजस्थानमधील अजमेरमध्ये शेजारच्या पत्नीला पळवून नेण्यावरून झालेल्या भांडणात तरुणाने महिलेच्या 12 वर्षांच्या निष्पाप मुलाची बोटे चावली. आता याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर क्लॉक टॉवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हे प्रकरण क्लॉक टॉवर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागरी बस्ती मालुसरे रोडचे असून येथील रहिवासी असलेल्या लक्ष्मी देवी यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे की, तिच्या शेजारी राहणारा 30 वर्षीय रोहित तिला अनेक दिवसांपासून त्रास देत होता. तिच्याबरोबर पळून जाण्याकरता जबरदस्ती करत होता. 

या संपूर्ण प्रकरणामध्ये गेल्या रात्री रोहितने पुन्हा एकदा आपले प्रयत्न खोडून काढण्याचा करत नकार देणाऱ्या लक्ष्मी आणि तिचा पती सुरेश यांना मारहाण केली. त्यावेळी लक्ष्मीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पीडित महिला पोलिस ठाण्यात पोहोचली असता, मागून संतप्त झालेल्या रोहितने पीडितेच्या १२ वर्षीय निष्पाप मुलालाही मारहाण केली आणि त्याच्या हाताचे एक बोट दाताने चावले.

नंतर पीडितेने तिच्या निष्पाप मुलाला उपचारासाठी जेएलएन रुग्णालयात नेले आणि त्याचवेळी क्लॉक टॉवर पोलिस ठाण्यात या संपूर्ण प्रकरणाची तक्रार केली. याप्रकरणी क्लॉक टॉवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्याचवेळी या घटनेपासून आरोपी रोहित फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Youth's 'act' to run away neighbor's wife; her kid's fingers bit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.