मृत्यूच्या १२ तास आधी युवकाची अखेरची पोस्ट; घरापासून ३५ किमी दूर सापडला मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 05:47 PM2022-12-01T17:47:26+5:302022-12-01T17:50:02+5:30

इतकेच नाही तर वरदानला सोसायटीत प्रवेश कसा मिळाला? प्रत्येक सोसायटी गेटवर चौकशीनंतर आतमध्ये सोडलं जाते. बाहेरचा व्यक्ती असताना तो आत कसा गेला? असा सवाल युवकाच्या वडिलांनी विचारला आहे.

Youth's last post 12 hours before death; The body was found 35 km away from the house | मृत्यूच्या १२ तास आधी युवकाची अखेरची पोस्ट; घरापासून ३५ किमी दूर सापडला मृतदेह 

मृत्यूच्या १२ तास आधी युवकाची अखेरची पोस्ट; घरापासून ३५ किमी दूर सापडला मृतदेह 

Next

नवी दिल्ली - गाजियाबाद येथील आशियाना सोसायटीत मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास १४ व्या मजल्यावरून पडून वरदान शर्मा या युवकाचा मृत्यू झाला. त्याला कुणी पडताना पाहिलं नव्हतं. इन्स्टाग्रामवर मृत्यूच्या १२ तासआधी लिहिलेल्या पोस्टमध्ये गुड बाय जिंदगी असं मेन्शन केले होते. सुरुवातीला पोलिसांना ही आत्महत्या असल्याचं वाटलं परंतु आता त्याच्या नातेवाईकांनी युवकाची हत्या झाल्याचा दावा केलाय. 

पोलीस ही हत्या की आत्महत्या याचा शोध घेत आहेत. नातेवाईकांनी म्हटलंय की, दुकानातून घरी जातोय असं म्हणत बाहेर पडलेला युवक गोल्फ लिंकच्या आशियाना सोसायटीत कसा पोहचला? घरापासून ३५ किमी दूर सोसायटीत त्याच्या कुणीही ओळखीचं नाही. जर त्याला आत्महत्या करायची असती तर इतक्या दूर अज्ञात ठिकाणी का गेला? असा सवाल उपस्थित करत युवकाच्या वडिलांनी तक्रार देत ही हत्या असल्याचं म्हटलं आहे. 

सोसायटीत का गेला वरदान?
युवकाचे वडील सुनील शर्मा म्हणाले की, मंगळवारी युवक त्यांच्या ऑप्टिकल्स दुकानात बसला होता. संध्याकाळी ५ च्या सुमारास दुकानातून घरी जातो सांगून तो निघाला. परंतु घरी पोहचलाच नाही. रात्री साडे नऊ वाजता माझ्या ओळखीच्या माणसाने गाजियाबादच्या आशियाना सोसायटीत वरदानसोबत दुर्घटना घडल्याची माहिती दिली. या सोसायटी ना कुणी नातेवाईक ना वरदानचा मित्र. मग तो तिथे गेला कसा आणि १४ व्या मजल्यावरून पडला कसा? असा सवाल त्यांनी केला आहे. 

इतकेच नाही तर वरदानला सोसायटीत प्रवेश कसा मिळाला? प्रत्येक सोसायटी गेटवर चौकशीनंतर आतमध्ये सोडलं जाते. बाहेरचा व्यक्ती असताना तो आत कसा गेला? त्याला कुणी बोलावलं होतं का? हे सगळं पोलीस चौकशीत समोर येणार आहे. तो १४ व्या मजल्यावर कसा पोहचला याचेही सत्य बाहेर यायला हवं असंही मृत युवकाचे वडील सुनील शर्मा म्हणाले. वरदान शर्मा हा बहिण शिवांगी आणि सिमरनहून छोटा होता. आई दिपा ही घटना घडली तेव्हा पंजाबला गेली होती. त्याठिकाणी भागवत कथा कार्यक्रम सुरू होता. मुलासोबत ही दुर्घटना घडल्याची बातमी ऐकताच ती परतली. मुलाच्या अचानक मृत्यूनं आईला मोठा धक्का बसला आहे. 
 

Web Title: Youth's last post 12 hours before death; The body was found 35 km away from the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.