युट्यूबरने घरात CCTV कॅमेरा बसवला, काही दिवसांनी खाजगी Video लीक, मुंबईतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 11:48 AM2023-12-15T11:48:24+5:302023-12-15T11:49:07+5:30
एका यूट्यूबरने खाजगी व्हिडिओ लीक झाल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
घरात बसवलेले सीसीटीव्ही किती धोकादायक असू शकतात, याचे नवीन उदाहरण समोर आले आहे. हे प्रकरण मुंबईतील वांद्रे येथील आहे. जिथे एका यूट्यूबरने त्याचा खाजगी व्हिडिओ लीक झाल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. २१ वर्षीय युट्युबरने त्याच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवला होता. मात्र या कॅमेराची कोणीतरी छेडछाड केली आणि पीडित युट्युबरचा खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.
सदर प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले की, १७ नोव्हेंबर रोजी कोणीतरी चुकीच्या पद्धतीने पीडितेच्या सीसीटीव्ही कॅमेरा हँक केला होता. परंतु हे प्रकरण ९ डिसेंबर रोजी उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी आयपीसी आणि आयटी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
यूट्यूबरने त्याच्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याने सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. यापैकी एक कॅमेरा त्याने आपल्या बेडरूममध्ये बसवला होता. ९ डिसेंबर रोजी पीडितेच्या मित्राने त्याला फोन करून सांगितले की, तुझे कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीडित यूट्यूबरने क्लिप तपासली असता हा व्हिडीओ त्याच्या खोलीतील असल्याचे आढळून आले. यानंतर पीडितेला लोकांचे सतत फोन येऊ लागले. सोशल मीडियावर कोणीतरी न्यूड क्लिप शेअर केली आणि ती व्हायरल झाली. सध्या पोलीस सर्व बाजूने तपास करत आहे.
सीसीटीव्ही व्हिडिओ कसा लीक होतो?
वास्तविक, सीसीटीव्ही वायफायला जोडलेले असतात. याचा अर्थ तुमच्या घरात सुरक्षिततेसाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीला इंटरनेटची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्याला तुमच्या सीसीटीव्ही हँक करायचा असल्यास ओरोपी पहिले वाय-फाय हँक करतो.