जिल्हा परिषद उपअभियंता, मैलकुलीस लाच घेताना रंगेहात पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 09:45 PM2021-01-12T21:45:49+5:302021-01-12T21:46:52+5:30
जिल्हा परिषदेचे बांधकाम उपविभाग क्रमांक १ चा उपअभियंता व मैलकुली यांना ३० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मंगळवारी दुपारी ४.३० वाजता रंगेहात पकडले.
अमरावती - जिल्हा परिषदेचे बांधकाम उपविभाग क्रमांक १ चा उपअभियंता व मैलकुली यांना ३० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मंगळवारी दुपारी ४.३० वाजता रंगेहात पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने ही कारवाई उपअभियंत्याच्या दालनात केली. उपअभियंता संध्या मेश्राम (४५) व मैलकुली अण्णा वानखडे (५३) असे लाच स्वीकारणाऱ्यांची नावे आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, थुगांव- खानापूर जोडरस्त्याच्या कामांच्या देयकांना मंजुरी आणि कुऱ्हा येथील हायमास्ट दिवे बसविण्याच्या कामांना आवंटित झालेल्या निविदेच्या करारनामा करून कार्यारंभ आदेश काढण्यासाठी दोघा
आरोपींनी ४० हजारांची मागणी केली. तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. अण्णा वानखडे याने ३० हजार रुपये स्वीकरल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, पोलीस कर्मचारी माधुरी साबळे, सुनील वऱ्हाडे, युवराज राठोड, अभय वाघ, चंद्रकांत जनबंधू यांनी केली आहे.