झोमॅटो बॉयने, स्विगी बॉयच्या कानाचा तोडला लचका! डिलिव्हरी बॅग न परतवल्याचा राग

By गौरी टेंबकर | Published: January 13, 2024 03:49 PM2024-01-13T15:49:23+5:302024-01-13T15:51:01+5:30

निर्मलनगर पोलिसात गुन्हा दाखल 

Zomato Boy broke Swiggy Boy s ear Anger at not returning the delivery bag | झोमॅटो बॉयने, स्विगी बॉयच्या कानाचा तोडला लचका! डिलिव्हरी बॅग न परतवल्याचा राग

झोमॅटो बॉयने, स्विगी बॉयच्या कानाचा तोडला लचका! डिलिव्हरी बॅग न परतवल्याचा राग

मुंबई: डिलीव्हरीसाठी वापरण्यात येणाऱ्या बॅगवरून झालेल्या वादात झोमॅटो डिलिव्हरी बॉयने स्वीगी बॉयच्या कानाचा कडकडून चावा घेत त्याचा लचका तोडण्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे पूर्व परिसरात घडला. या विरोधात निर्मल नगर पोलिसांनी जाफर शेख (२४) नामक इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

तक्रारदार पीरमोहम्मद पठाण (२९) हे वांद्रे पश्चिम परिसरात राहत असून स्विगी कंपनीत डिलिव्हरी बॉयची नोकरी करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, वांद्रेच्या बेहरामनगर परिसरात राहणाऱ्या जाफरशी गेल्या पाच सहा वर्षांपासून त्यांची मैत्री आहे. जाफरचे लग्न ठरल्याने घरात साफसफाई सुरू होती. त्यामुळे त्याची झोमॅटोची बॅग त्याने पठाण यांच्याकडे ठेवायला दिली होती. अलीकडे जाफर त्याची बॅग पठाण यांना आणून देण्याची मागणी करत होता. मात्र पठाण यांना वेळ नसल्याने त्यानी  त्याची बॅग त्यांच्या घरी येऊन घेऊन जायला सांगितले. अखेर १२ जानेवारी रोजी त्यांचा मित्र फैजान शेख याला भेटायला वांद्रे पूर्वच्या खेरनगर परिसरात पठाण गेले होते.

ते दोघे गप्पा मारत असताना जाफर हा त्याची मोटरसायकल घेऊन आला आणि त्याने पठाण यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. त्यामुळे ते खाली पडल्यानंतर जाफरने पठाण यांना तू मेरी बॅग क्यू नही लोटा रहा असे म्हणत डाव्या कानाचा कडकडून चावा घेतला आणि पळून गेला. त्याचाव्यामुळे त्यांच्या कानाचा लचका तुटला आणि त्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यांचा मित्र फैजान त्यांना सांताक्रुजच्या वी एन देसाई रुग्णालयात घेऊन गेला. तिथे डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर पठाण यांनी निर्मल नगर पोलीस ठाणे गाठत जाफर विरोधात तक्रार दिली. त्यानुसार भारतीय दंड संहिता कलम २७९, ३२५ व ३३६ अंतर्गत जाफर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Zomato Boy broke Swiggy Boy s ear Anger at not returning the delivery bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.