पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या १३० शाळांना लागणार कुलूप?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:33 AM2021-02-24T04:33:23+5:302021-02-24T04:33:23+5:30
सुरूवातीच्या काळात इंग्रजी शाळांचे प्रमाण शहरामध्येच अधिक हाेते. कालांतराने गावाेगावी अशा शाळा सुरू झाल्या आहेत. पालकही अशा शाळांकडे आकर्षित ...
सुरूवातीच्या काळात इंग्रजी शाळांचे प्रमाण शहरामध्येच अधिक हाेते. कालांतराने गावाेगावी अशा शाळा सुरू झाल्या आहेत. पालकही अशा शाळांकडे आकर्षित हाेत असल्याने त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषद शाळांवर हाेऊ लागाला आहे. मध्यंतरी राज्य शासनाने २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळांचे नजीकच्या शाळांमध्ये समायाेजन करण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून तसा अहवाल तयार करून शासनाकडे सादर केला हाेता. त्यानुसार जिल्ह्यात २० पेक्षा कमी पट असणार्या शाळांची संख्या १३० च्या घरात आहे. अशा शाळा समायाेजित करण्याच्या अनुषंगाने काही जिल्ह्यांत प्रक्रिया सुरू झाली आहे. येणार्या शैक्षणिक वर्षापर्यंत ही प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यास जिल्ह्यातील तब्बल १३० शाळांना कायमचे टाळे लागणार आहेत. या शाळा दुसर्या शाळांमध्ये मर्ज करण्यात आल्यानंतर थाेडेथाेडके नव्हे तर तब्ब्ल अडीचशेवर शिक्षकांचा प्रश्न निर्माण हाेणार आहे. या अनुषंगाने एका आमदारांनी तारांकित प्रश्नही विचारला आहे.
अशी आहे आकडेवार
१००२
जिल्हा परिषदेच्या एकूण शाळांची संख्या
००.००
पटसंख्येअभावी यापूर्वी बंद झालेल्या शाळज्ञ
१३०
२० पेक्षा कमी पट असलेल्या शाळा
एवढ्या शाळांचे हाेणार समायाेजन
२० पेक्षा कमी पट असलेल्या शाळांचे नजीकच्या शाळांमध्ये समायाेजन करण्याबाबत शासनाच्या वेळाेवेळी सूचना आल्या आहेत. त्यानुसार २० पेक्षा कमी पट असलेल्या १३० शाळा आहेत. यामध्ये भूम तालुक्यातील १४, कळंब १८, लाेहारा ०४, उमरगा १८, उस्मानाबाद २८, परंडा २१, तुळजापूर १९ आणि वाशी तालुक्यातील १० शाळांचा समावेश आहे.
शिक्षकांचे काय?
जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या सुमारे १३० शाळांचा पट वीस पेक्षा कमी आहे. या शाळांचे समायाेजन झाल्यानंतर थाेडेथाेडके नव्हे, तर अडीचशेवर शिक्षकांचा प्रश्न निर्माण हाेणार आहेत. अगाेदरच आपल्याकडे शिक्षक अतिरिक्त आहेत. त्यात आणखी अडीचशेवर गुरूजींची भर पडल्यानंतर समायाेजनाचा प्रश्न अधिक गंभीर हाेऊ शकताे.
विद्यार्थ्यांचे काय?
वीस पेक्षा कमी पट असलेल्या शाळा नजीकच्या शाळांमध्ये समायाेजित केल्यानंतर विद्यार्थ्यांनाही गैरसाेयीचा सामना करवा लागू शकताे. कारण यातील काही गावे आडवळणी आहेत. तेथे जाण्यासाठी वाहनांची साेय नाही. सायकलीवरून जायचे म्हटले तर रस्तेही चांगले नाहीत. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडणार आहे.
काेट...