उमरग्यातील २ लाख २१ हजार व्यक्ती लसीकरणाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:22+5:302021-07-23T04:20:22+5:30

उमरगा (जि. उस्मानाबाद) : मागील दीड वर्षापासून कोविड-१९ आजाराने जगभर थैमान घातले आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी सर्वात प्रभावी ...

2 lakh 21 thousand elderly people are waiting for vaccination | उमरग्यातील २ लाख २१ हजार व्यक्ती लसीकरणाच्या प्रतीक्षेत

उमरग्यातील २ लाख २१ हजार व्यक्ती लसीकरणाच्या प्रतीक्षेत

googlenewsNext

उमरगा (जि. उस्मानाबाद) : मागील दीड वर्षापासून कोविड-१९ आजाराने जगभर थैमान घातले आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी सर्वात प्रभावी प्रतिबंधक उपाययोजना म्हणजे लसीकरण. परंतु, उमरगा तालुक्यात लसीकरणाचा टक्का फारसा वाढताना दिसत नाही. आजही २ लाख ६३ हजार ३७३ पैकी केवळ ४१ हजार ६६८ जणांनीच लसीचा पहिला डाेस घेतला. तर दुसरा डाेस घेतलेल्यांची संख्या अवघी १३ हजार १०१ एवढी आहे. शासन आणि प्रशासनाकडून जनजागृती केली जात असली तरी काही लाेकांमध्ये लसीच्या अनुषंगाने भीती आहे. तसेच लसही मागणीप्रमाणे उपलब्ध हाेत नाही. यासह इतर कारणांमुळे लसीकरणाचा टक्का अपेक्षित गतीने वाढताना दिसत नाही.

जगातील १९७ देशांमध्ये कोविड-१९ चे लसीकरण चालू आहे. २८० कोटींपेक्षा जास्त लोकांनी लस घेतली आहे. तर भारतातील ३० कोटींपेक्षा जास्त लोकांना ही लस देण्यात आली आहे. महाराष्ट्रातही जवळपास ३ काेटींपेक्षा अधिक लाेकांनी या लसीचा डाेस घेतला आहे. आजवर संबंधितांमध्ये काेणत्याही स्वरूपाचे गंभीर दुष्परिणाम दिसून आले नाहीत. असे असतानाही खासकरून ग्रामीण भागात लसीच्या अनुषंगाने काही अफवा पसरल्या आहेत. आराेग्य यंत्रणेकडून करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे या अफवांची तीव्रता कमी झाली आहे. असे असले तरी काही लाेक अशा अफवांचा दाखला देत लस घेणे टाळत आहेत. लसीकरण कमी हाेण्यास याही कारणाचा काहीअंशी हातभार आहे. मात्र, यासाेबतच दुसरीकडे आराेग्य यंत्रणेकडून ज्या प्रमाणात डाेस मागणी केले जात आहेत, त्या प्रमाणात शासनाकडून पुरवठा हाेत नाही. याचाही परिणाम लसीकरणाच्या गतीवर हाेत असल्याचे बाेलले जाते. त्यामुळेच तालुक्यातील लसीकरणाचा टक्का माेठ्या गतीने वाढताना दिसत नाही. उमरगा तालुक्याची लोकसंख्या २ लाख ६३ हजार ३७३ एवढी आहे. आजवर ४१ हजार ६६८ लोकांनी पहिला डाेस घेतला आहे. तर केवळ १३ हजार १०१ लोकांनी दुसरा डोस घेतला. म्हणजेच आजही २ लाख २१ हजार व्यक्ती लसीकरणापासून वंचित आहेत. लसीकरणाची हीच गती भविष्यातही कायम राहिल्यास संपूर्ण लाेकसंख्येचे लसीकरण हाेण्यास आणखी किती वेळ लागेल? याचा विचार न केलेलाच बरा.

चाैकट...

४४१ सत्रांत लसीकरण....

उमरगा तालुक्यात ४४१ सत्रात आजपर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये १ हजार ६७९ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला तर १ हजार १६० कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. ४ हजार ५६५ फ्रंटलाईन वर्कर यांनी पहिला तर १ हजार ९०१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वयोगटातील ९ हजार ९८८ जणांनी पहिला तर ७०१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षांवरील वयोगटातील २५ हजार ३७७ जणांनी पहिला डोस तर ९ हजार ३३९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तालुक्यातील ५९ गरोदर महिलांनी कोविड लसीकरणचा पहिला डोस घेतला आहे. आतापर्यंत तालुक्यातील ४५ वर्षांवरील वयोगटातील ५२ टक्के तर १८ ते ४५ वयोगटातील ९ टक्के व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

काेट...

तालुक्याची लोकसंख्या २ लाख ६३ हजार ३७३ असून आजवर ४१ हजार ६६८ लोकांनी पहिला कोविड १९ डोस घेतला आहे. तर १३ हजार १०१ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. आपले वय १८ वर्षांपेक्षा जास्त असेल तर स्वतः लस घ्या आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रवृत्त करा. जोपर्यंत प्रत्येक जण संरक्षित होणार नाही, तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही.

- डॉ. प्रताप शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी, उमरगा

Web Title: 2 lakh 21 thousand elderly people are waiting for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.