२०४ लाभार्थ्यांना मिळणार कृत्रिम अवयव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:12 AM2021-02-05T08:12:09+5:302021-02-05T08:12:09+5:30
सास्तूर येथे दोन दिवसीय तपासणी शिबिर लोहारा : तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत दिव्यांगांना सहायक साधने व कृत्रिम ...
सास्तूर येथे दोन दिवसीय तपासणी शिबिर
लोहारा : तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत दिव्यांगांना सहायक साधने व कृत्रिम उपकरणे मोफत वाटपासाठी दोन दिवसीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात २०४ दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून, कृत्रिम पाय, कॅलिपर्स, क्रेचससाठी मोजमाप घेण्यात आले. तसेच व्हीलचेअर, तीन चाकी सायकल, श्रवण यंत्र, ब्रेल काठी, एम. आर. किटसाठी दिव्यांग व्यक्तींची निवड करण्यात आली.
सीएसआर योजनेंतर्गत जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग व निवासी दिव्यांग शाळा (सास्तूर) यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचे उद्घाटन भारत कांबळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी बालाजी शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून कमलेश यादव, गौरीश साळुंके, वंचित बहुजन आघाडीचे लोहारा तालुकाध्यक्ष रविकिरण बनसोडे, शिबिराचे समन्वयक बी. टी. नादरगे, भौतिकोपचार तज्ज्ञ डॉ. मंगेश कुलकर्णी, प्रा. बी. एम. बालवाड, शौकतअली मासुलदार, महंमद अत्तार, भाऊसाहेब आंबेकर उपस्थित होते. सर्व पात्र लाभार्थ्यांना मार्च-२०२१ मध्ये मोफत साहित्य वितरित करण्यात येणार असल्याचे आयोजक कमलेश यादव यांनी सांगितले.
शिबिरासाठी आर. डी. बेंबडे, आर. ई. इरलापल्ले, बालाजी गुणाले, आर. पी. गुंडुरे, अंजली चलवाड, सुरेखा परीट, ज्ञानोबा माने, गोरख पालमपल्ले, शंकरबावा गिरी, निशांत सावंत, निवृत्ती सूर्यवंशी, दगडू सगर, सूर्यकांत कोरे, भीमराव गिर्दवाड, सुनीता कज्जेवाड, किरण मैंदर्गे, प्रयागताई पवळे आदींनी पुढाकार घेतला.