उमेद अंतर्गत गटांना २५ लाखांचे अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:33 AM2021-02-16T04:33:36+5:302021-02-16T04:33:36+5:30
कळंब : तालुक्यातील आंदोरा येथे आयोजित बँक मेळाव्यात उमेद अभियानांतर्गत स्थापन झालेल्या तालुक्यातील आंदोरा व कन्हेरवाडी येथील १८ महिला ...
कळंब : तालुक्यातील आंदोरा येथे आयोजित बँक मेळाव्यात उमेद अभियानांतर्गत स्थापन झालेल्या तालुक्यातील आंदोरा व कन्हेरवाडी येथील १८ महिला स्वयंसहाय्यता गटांना २५ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.मेळावञयाचे उद्घाटन सहाय्यक गटविकास अधिकारी कुसनेनीवार, एसबीआयचे शाखा व्यवस्थापक दिनेश विपीन, तालुका अभियान समन्वयक सचिन ठोकळ यांच्या हस्ते झाले. महिला बचत गटांनी या कर्जाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शाशञवत उपजिविकेची साधने उभी करून आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन कुसनेनीवार यांनी यावेळी केले. या मेळाव्यात आंदोरा येथील जिजाऊ महिला स्वयंसहाय्यता गट, समर्थ महिला स्वयंसहाय्यता गट, सरस्वती महिला स्वयंसहाय्यता गट यांना प्रत्येकी एक लाख तर कन्हेरवाडी येथील देवी सटवाई देवी, अष्टविनायक, कल्पतरू, क्रांती ज्योती, अन्नपुर्णा, निराधार, राधा-कृष्ण, माहेश्वरी, विठू माऊली, श्री गणेश, राधा-कृष्ण, मायावती भाग्यलक्ष्मी, महालक्ष्मी, शिवशक्ती महिला स्वयंसाय्यता गटांना प्रत्येक हक लाख व दोन लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. प्रास्ताविक तालुका व्यवस्थापक विलास तरटे यांनी केले तर अमोल सालपे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रभाग समन्वयक सूर्यकांत खेडकर, अश्वनी कवडे, लता कवडे, जयश्री कापसे, बँक सखी स्वाती गुरव, मेश मिटकरी आदींनी सहकार्य केले.