पालिकेच्या सभेत २६ विषय मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:23 AM2021-06-25T04:23:23+5:302021-06-25T04:23:23+5:30
यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक ४ मधील विविध विकासकामांचा समावेश करावा, अशी मागणी नगरसेवक सुनील रोचकरी यांनी केली होती. त्या ...
यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक ४ मधील विविध विकासकामांचा समावेश करावा, अशी मागणी नगरसेवक सुनील रोचकरी यांनी केली होती. त्या मागणीचा या सभेत समावेश करून प्रभाग क्रमांक ४ मधील सर्व कामांना मंजुरी देण्यात आली. तसेच दिव्यांगांसाठी निधीमध्ये वाढ करून ते देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. कार्यालयातील विविध विभागांकडून मागविलेल्या निविदांना मंजुरी देण्याचेही ठरविण्यात आले. विषय क्रमांक २१ मधील अनधिकृत बांधकाम या तक्रारअर्जावर कोणतीही कारवाई झाली नाही. यावर चर्चा होऊन हा विषय मुख्याधिकारी यांनी हाताळावा, असा निर्णय झाला. शहर विकास प्राधिकरणांतर्गत पथदिवे बसविण्याच्या उर्वरित कामावर विचारविनिमय करून निर्णय घेण्यात आला. कार्यालयातील मंजूर आकृतीबंध अस्थायी रिक्त तीन मुकादमपदावर सेवाज्येष्ठतेनुसार पदस्थापना तसेच पाणीपुरवठा व इतर मनुष्यबळपुरवठा करण्याच्या प्रक्रियेस एप्रिल २१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेस १२ नगरसेवकांसह कार्यालय अधीक्षक वैभव पाठक, लिपिक महादेव सोनार व इतर विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.