उस्मानाबादेत अंथरणार ३०० किमी भूमिगत ड्रेनेज लाईन..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:36 AM2021-09-05T04:36:43+5:302021-09-05T04:36:43+5:30

उस्मानाबाद : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगराेत्थान महाअभियानांतर्गत उस्मानाबाद शहरासाठी भूमिगत मलनिस्सारण प्रकल्प (अंडर ग्राऊंड ड्रेनेज) मंजूर झाला आहे. प्रकल्पाच्या ...

300 km underground drainage line to be laid in Osmanabad ..! | उस्मानाबादेत अंथरणार ३०० किमी भूमिगत ड्रेनेज लाईन..!

उस्मानाबादेत अंथरणार ३०० किमी भूमिगत ड्रेनेज लाईन..!

googlenewsNext

उस्मानाबाद : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगराेत्थान महाअभियानांतर्गत उस्मानाबाद शहरासाठी भूमिगत मलनिस्सारण प्रकल्प (अंडर ग्राऊंड ड्रेनेज) मंजूर झाला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यावर सुमारे १६० काेटी रुपये खर्च हाेणार आहेत. या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम भागातील शहरामध्ये सुमारे ३०० किलाेमीटर एवढी भूमिगत ड्रेनेज लाईन अंथरण्यात येणार आहे. प्रत्येक ३३ मीटरवर एक चेंबर असेल. या ड्रेनेज लाईनला शहरातील सुमारे २५ हजार घरांचे सेफ्टीक टॅंकचे कनेक्शन जाेडण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली.

उस्मानाबाद नगर परिषदेत शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी शिवसेनेचे गटनेते साेमनाथ गुरव, बांधकाम सभापती प्रदीप घाेणे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

उस्मानाबादेत भूमिगत मलनिस्सारण प्रकल्पाचा प्रस्ताव पाठविण्याचा ठराव पालिकेच्या सभेत पारित करण्यात आला. यानंतर जून २०१९ मध्ये परिपूर्ण प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी जीवन प्राधिकरणाकडे सादर केला. येथून मंजुरी मिळाल्यानंतर नगर परिषद प्रशाासनाच्या संचालकांकडे हा प्रस्ताव ऑगस्ट २०२० मध्ये पाठविला. याही ठिकाणी हिरवा कंदील मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाच्या तांत्रिक समितीच्या मान्यतेसाठी नाेव्हेंबर २०२० मध्ये प्रस्ताव दिला. फेब्रुवारी २०२१ मध्ये नगरविकास मंत्रालयाची मान्यता मिळाली. मे २०२१ मध्ये सविस्तर शासनादेश (जीआर) निघाला. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे १६८ काेटी ६१ लाख रुपये मंजूर करण्यात आले. यात राज्य सरकारचा ७५ टक्के म्हणजेच १२६.४६ काेटी तर पालिकेचा वाटा २५ टक्के म्हणजेच ४२.१५ काेटी एवढा असेल, असे नगराध्यक्ष राजेनिंबाळकर म्हणाले. पहिल्या टप्प्यात औरंगाबाद-साेलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम भागातील शहरात ड्रेन लाईन टाकण्यात येणार आहे. या ड्रेनेज लाईनची एकूण लांबी साधारपणे ३०० किलाेमीटर असेल. या लाईनवर प्रत्येकी ३३ मीटरवर एक चेंबर असेल. या सर्व चेंबरला मिळून शहरातील सुमारे २५ हजार घरांतील सेफ्टीक टॅंक व सांडपाण्याचे कनेक्शन जाेडण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाने दाेन वर्षांची मुदत दिली आहे. सप्टेंबर अथवा ऑक्टाेबर महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात हाेईल, असे नगराध्यक्ष राजेनिंबाळकर म्हणाले.

चाैकट...

२२९ काेटींचा ‘डीपीआर’...

उस्मानाबादेत दाेन टप्प्यांत प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १६८ काेटी रुपये मंजूर आहेत. यातून राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम भागातील शहरात ड्रेनेज लाईन टाकली जाईल. यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित निधीतून शहराच्या पूर्व भागात ड्रेनेज लाईन टाकली जाणार आहे.

२ काेटी २० लाख लीटरचा ‘एसटीपी’

ड्रेनेज लाईनच्या माध्यमातून शहरातून एकत्र हाेणारे सांडपाणी साठवून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी वैराग राेडलगत २ काेटी २० लाख लीटर क्षमतेचा सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट (एसटीपी) उभारण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रियेनंतर हे पाणी राघुचीवाडी प्रकल्पात साेडण्यात येईल.

Web Title: 300 km underground drainage line to be laid in Osmanabad ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.