वीज वसुलीतील ३३ टक्के रक्कम दुरुस्तीच्या कामासाठी वापरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:30 AM2021-05-22T04:30:21+5:302021-05-22T04:30:21+5:30

लोहारा : मार्च व एप्रिल महिन्यात वीज बिलाच्या झालेल्या वसुलीतील ३३ टक्के रक्कम संबंधित गावातील वीज दुरुस्तीच्या कामासाठी वापरण्याचे ...

33% of electricity recovery amount should be used for repair work | वीज वसुलीतील ३३ टक्के रक्कम दुरुस्तीच्या कामासाठी वापरावी

वीज वसुलीतील ३३ टक्के रक्कम दुरुस्तीच्या कामासाठी वापरावी

googlenewsNext

लोहारा : मार्च व एप्रिल महिन्यात वीज बिलाच्या झालेल्या वसुलीतील ३३ टक्के रक्कम संबंधित गावातील वीज दुरुस्तीच्या कामासाठी वापरण्याचे निर्देश आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिले आहेत.

लोहारा तालुक्यातील विविध गावातील वीज वितरणाबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आ. ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणचे अधिकारी तसेच विविध गावच्या सरपंचांची बैठक लोहारा येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. कोरोना पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये व शारीरिक अंतर राखले जावे या दृष्टीने पहिल्या टप्प्याअंतर्गत लोहारा शहरसह तालुक्यातील कास्ती (खु), कास्ती (बु), कानेगाव, माकणी, बेंडकाळ, तोरंबा, मोघा (बु), मोघा (खु), वडगाव या गावातील समस्या जाणून घेऊन त्या त्वरित सोडविण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने उपायोजना आखण्याच्या सूचना आ. चौगुले यांनी केल्या. या सर्व गावातील सिंगल फेज योजना कार्यान्वित करणे, पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र डीपी बसवणे, प्रत्येक गावातील प्रत्येक रोहित्रावरील अतिरिक्त दाबाचा सर्व्हे करून तेथे स्वतंत्र रोहित्र बसविण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजनकडे प्रस्ताव पाठवणे, एका फिडरवर एकच गाव कार्यान्वित करणे, नादुरुस्त डीपी तत्काळ दुरुस्त करून देणे, पाणीपुरवठा योजनेचे डिमांड भरूनही अद्याप वीज जोडणी न झालेल्या ठिकाणी त्वरित वीज जोडणी देणे, याबाबत सविस्तर चर्चा करून समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे उप कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, उमरगा तालुका प्रमुख बाबूराव शहापुरे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक अभिमान खराडे, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्यासह सर्व गावचे सरपंच उपस्थित होते.

फोटो - लोहारा तालुक्यातील विविध गावातील वीज वितरणाबाबतच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीस उपस्थित आ. ज्ञानराज चौगुले, मोहन पणुरे, बाबूराव शहापुरे आदी.

Web Title: 33% of electricity recovery amount should be used for repair work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.