जलजीवनसाठी ३७३ कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:32 AM2021-03-10T04:32:29+5:302021-03-10T04:32:29+5:30

जिल्ह्यातील ७२० गावांपैकी ‘अ’ वर्गाची २५५ गावे असून, या गावात नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नळ जोडणी देणे, पंपाची ...

373 crore plan for aquatic life | जलजीवनसाठी ३७३ कोटींचा आराखडा

जलजीवनसाठी ३७३ कोटींचा आराखडा

googlenewsNext

जिल्ह्यातील ७२० गावांपैकी ‘अ’ वर्गाची २५५ गावे असून, या गावात नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नळ जोडणी देणे, पंपाची क्षमता वाढविणे आणि गरजेनुसार पाईपलाईन टाकण्याची कामे करण्यात येणार आहेत. ‘ब’ वर्गवारीत २९४ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये प्रति ग्रामस्थ ४० ते ५५ लिटर पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे, अतिरिक्त पाण्याची टाकी उभारणे, पाईप लाईन टाकणे आदी कामे करण्यात येतील. नवीन प्रस्तावित योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १३९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. तर योजनाच नसलेल्या गावांची संख्या ३२ आहे. नवीन प्रस्तावित योजनेअंतर्गत गावांत पाणी वितरणाची व्यवस्था, पाण्याची टाकी आदी नवीन कामे करण्यात येणार आहेत. यासाठी ३७३ कोटी १० लाख ४९ हजार रुपयांची आवश्यकता असून, तसा आराखडा तयार करुन तो मंजूर करण्यात आला आहे.

सोलार पंपासाठी १९ कोटी...

जल जीवन मिशन योजनेंतर्गत विजेचा व्यत्यय येऊन पाणी पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी सोलार पंप बसविण्याचेही नियोजित आहे. एकूण २७३ गावांमध्ये असे सोलार पंप बसविण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी आराखड्यात १९ कोटी ११ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. शिवाय, अन्य काही गोव, वाडी, वस्त्या या नजिकच्या गावच्या पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट केल्या जात आहेत.

टँकरग्रस्त गावांना प्रधान्य...

गल्या पाच वर्षांपासून टँकरने पाणीपुरवठा होणार्या गावांची तसेच चार, तीन व दोन वर्षे टँकर लागलेल्या गावांचीही माहिती एकत्रित करण्यात आली आहे. या माहितीप्रमाणे योजनेत पाच वर्षे टँकर असलेल्या गावास प्रथम प्राधान्याने समाविष्ट करण्यात येणार आहे. हाच प्राधान्यक्रम पुढे चार, तीन, दोन वर्षांच्या टँकरनुसार ठेवण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

अ वर्ग गावे : २५५, प्रस्तावित खर्च-१०१.१९ कोटी

ब वर्ग गावे : २९४, प्रस्तावित खर्च - १५७.८४ कोटी

योजनेतील नवीन गावे : १३९, प्रस्तावित खर्च - ८१.७६ कोटी

योजना नसलेली गावे : ३२, प्रस्तावित खर्च - १३.१९ कोटी

Web Title: 373 crore plan for aquatic life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.