धाराशिव जिल्ह्यात अवकाळीने ४ हजार हेक्टर्स बाधित, सहा कोटींची मागणी

By चेतनकुमार धनुरे | Published: April 18, 2023 06:40 PM2023-04-18T18:40:41+5:302023-04-18T18:40:55+5:30

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह पाऊस झाला होता.

4 thousand hectares affected by bad weather in Dharashiv district, demand of 6 crores | धाराशिव जिल्ह्यात अवकाळीने ४ हजार हेक्टर्स बाधित, सहा कोटींची मागणी

धाराशिव जिल्ह्यात अवकाळीने ४ हजार हेक्टर्स बाधित, सहा कोटींची मागणी

googlenewsNext

धाराशिव : मार्चपाठोपाठ एप्रिल महिन्यातही अवकाळीचा तडाखा सुरुच आहे. ७ ते ९ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या वादळी वारे व पावसामुळे विशेषत: बागायती व फळपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, सुमारे ४ हजार हेक्टर्स क्षेत्र यामुळे बाधित झाले असून, त्यापोटी सवासहा कोटी रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह पाऊस झाला होता. याचा सर्वाधिक फटका हा धाराशिव व कळंब तालुक्याला बसला आहे. या दोनच तालुक्यात सुमारे ३८७० हेक्टर्स क्षेत्र बाधित झाले आहे. महसूल व कृषी विभागाने जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या सूचनेनुसार या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण केले आहेत. मंगळवारी या नुकसानीचा अहवाल तयार होवून तो शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील ६ हजार ६९२ शेतकर्यांच्या फळ, पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांचे एकूण ३ हजार ९८३ हेक्टर्स ८० आर क्षेत्र बाधित झाले असून, यापोटी शासनाकडे ६ कोटी २४ लाख ६८ हजार रुपये आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: 4 thousand hectares affected by bad weather in Dharashiv district, demand of 6 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.