अंत्यविधीसाठी घेतले ४ हजार, पालिका कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:32 AM2021-04-25T04:32:15+5:302021-04-25T04:32:15+5:30

उस्मानाबाद तालुक्यातील बामणी येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला होता. नगरपालिकेच्यावतीने कोरोना बाधित ...

4,000 taken for funeral, municipal employees suspended | अंत्यविधीसाठी घेतले ४ हजार, पालिका कर्मचारी निलंबित

अंत्यविधीसाठी घेतले ४ हजार, पालिका कर्मचारी निलंबित

googlenewsNext

उस्मानाबाद तालुक्यातील बामणी येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला होता. नगरपालिकेच्यावतीने कोरोना बाधित रुग्णांचा विनामूल्य अंत्यविधी करण्यात येतो. मात्र, तुळजापूर येथे बामणी येथील त्या मृत रुग्णाच्या नातेवाईकांकडे अंत्यविधी करण्यासाठी नगरपालिका सफाई कामगार शंकर राजेंद्र कांबळे याने ४ हजार रुपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारली होती. याचवेळी नातेवाईकांनी मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा मुख्याधिकारी लोकरे यांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठून संबंधित मृत व्यक्तीचे नातेवाईक व कर्मचाऱ्यांना समोरा-समोर घेऊन चौकशी केली. तेव्हा सफाई कामगार शंकर कांबळे याने ४ हजार रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले. यानंतर मुख्याधिकारी लोकरे यांनी ही रक्कम त्या नातेवाईकाला परत करून सफाई कामगारावर निलंबनाची कारवाई केली.

कोट...

शुक्रवारी कर्मचाऱ्याने अंत्यविधीसाठी पैसे घेतल्याचा फोन आल्यानंतर स्वतः उपजिल्हा रुग्णालयात जाऊन कर्मचारी आणि नातेवाईक यांना समोरा-समोर घेऊन चौकशी केली. तेव्हा कर्मचाऱ्याने चार हजार रुपये घेतल्याचे निदर्शनास आले. ही रक्कम त्या नातेवाईकांना परत करून कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली.

-आशिष लोकरे, मुख्याधिकारी, तुळजापूर

Web Title: 4,000 taken for funeral, municipal employees suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.