राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धेत ५० जणांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:39 AM2021-09-07T04:39:12+5:302021-09-07T04:39:12+5:30
याचे उद्घाटन बालरोगतज्ज्ञ डॉ. एन. डी. बिराजदार, डॉ. खिचडे, डॉ. दत्तात्रय खलंगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. पंडित ...
याचे उद्घाटन बालरोगतज्ज्ञ डॉ. एन. डी. बिराजदार, डॉ. खिचडे, डॉ. दत्तात्रय खलंगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. पंडित बुटूकणे, व्यंकट गुंजोटे, जुगल खंडेलवाल, शिवानंद दळगडे, सतीश साळुंके, संजय कुलकर्णी, अनिल मदनसुरे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. वेशभूषा स्पर्धेत विविध शाळेतून ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये २५ राधाकृष्ण जोड्यांचा समावेश होता. यापैकी के. डी .शेंडगे सीबीसी प्रशालेतील शौर्य परमेश्वर चव्हाण व कल्याणी सिद्राम ख्याडे या राधाकृष्ण जोडीने प्रथम क्रमांक मिळविला. गुंजाेटी येथील श्रीकृष्ण विद्यालयाची प्रज्ञा सुनील चौधरी हिने द्वितीय क्रमांक पटकावला. तर डॉ. के. डी. शेंडगे प्रशालेतील अखिलेश कोल्हे व गौरी बिराजदार ही जाेडी तृतीय पुरस्काराची मानकरी ठरली. परीक्षक म्हणून कोमल मुर्जानी, अर्चना खंडेलवाल, सुषमा लड्डा, सविता दळवी यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन रोटेरियन परमेश्वर सुतार यांनी केले तर आभार रोटरी सचिव गुंजोटे यांनी मानले.