मासेमारीसाठी गेलेली ५० वर्षीय व्यक्ती तेरणा नदीपात्रात बुडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:37 AM2021-09-06T04:37:15+5:302021-09-06T04:37:15+5:30
कसबे तडवळे - उस्मानाबाद तालुक्यातील रुईनजीक तेरणा नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी एक ५० वर्षीय व्यक्ती बुडाल्याची घटना रविवारी ...
कसबे तडवळे - उस्मानाबाद तालुक्यातील रुईनजीक तेरणा नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी एक ५० वर्षीय व्यक्ती बुडाल्याची घटना रविवारी घडली. दिवसभराच्या शाेधकार्यानंतरही संबंधित व्यक्ती सापडली नाही.
कळंब तालुक्यातील गाैर येथील सुभाष सुखदेव कसबे (वय ५०), प्रदीप राजेंद्र ताैर (२५), लक्ष्णम चाेखा ताकपिरे (५०) हे तिघेजण रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रूईनजीक तेरणा नदीपात्रात मासेमारीसाठी गेले हाेते. तिघांपैकी सुभाष कसबे हे जाळे घेऊन नदीत उतरले; परंतु पाण्याचा प्रवाह आणि खाेलीही जास्त असल्याने ते पाण्यात बुडू लागले. आपला सहकारी पाण्यात बुडत असल्याचे पाहून लक्ष्मण ताकपिरे यांनी त्यांना वाचविण्यासाठी नदीपात्रात उडी घेतली. प्रयत्नाअंती सुभाष कसबे यांना पाण्याबाहेर काढले; परंतु पाण्याचा प्रवाह वाढत गेल्याने लक्ष्मण ताकपिरे यांना पाण्याच्या बाहेर पडता न आल्याने ते बुडाले. उपस्थित दाेघांनी घटनेची माहिती पाेलिसांना दिली. यानंतर तातडीने ढाेकी पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. बुडालेल्या व्यक्तीचा शाेध घेतला; परंतु संबंधित व्यक्तीचा तपास लागला नाही. यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी आले. बाेटीच्या साहाय्याने सायंकाळी सात वाजेपर्यंत शाेधमाेहीम राबविण्यात आली; परंतु हाती यश आले नाही. दिवस मावळल्यानंतर प्रशासनाने शाेधकार्य थांबविले. साेमवारी सकाळी दिवस उगवताच शाेधकार्य सुरू केले जाईल, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.
050921\2012-img-20210905-wa0047.jpg
पाण्यात बुडालेला लक्ष्मण चोखा ताकपिरे वय ५०