पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेत ६० विद्यार्थ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:39 AM2021-09-07T04:39:17+5:302021-09-07T04:39:17+5:30
रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पंडित बुटूकणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यंकट गुंजोटे, डाॅ. नीलेश महामुनी यांची प्रमुख ...
रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पंडित बुटूकणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यंकट गुंजोटे, डाॅ. नीलेश महामुनी यांची प्रमुख उपस्थिती हाेती. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक संजय खामकर, तात्याराव फडताळे यांनी मार्गदर्शन करून गणपतीच्या मूर्ती तयार करून घेतल्या. या उपक्रमामध्ये विविध प्रशालेतील जवळपास ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नाेंदविला हाेता. सहभागी विद्यार्थ्यांतून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढले. लहान गटातून चिन्मय नीलेश महामुनी, प्रसाद विक्रांत मोरे व गंगाधर तात्याराव कोरे हे तिघे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले. प्रांजली दत्ता जाधव या विद्यार्थिनीस उत्तेजनार्थ पारिताेषिक देण्यात आले. मोठ्या गटातून सार्थक महेश जाधव प्रथम, अपूर्व अनिल मदनसुरे द्वितीय, तर मैथिली मधुकर जाधव या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला. प्रणाली दत्ता जाधव या विद्यार्थिनीस उत्तेजनार्थ पारिताेषिक दिले.