लातूर-टेंभुर्णी महामार्गासाठी ७९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:31 AM2021-04-06T04:31:15+5:302021-04-06T04:31:15+5:30

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रास जोडणारा मुख्य मार्ग असलेला टेंभुर्णी-कुर्डुवाडी-बार्शी-येडशी हा एक प्रमुख मार्ग आहे. हा महामार्ग लातूर, उस्मानाबाद व ...

79 crore for Latur-Tembhurni highway | लातूर-टेंभुर्णी महामार्गासाठी ७९ कोटी

लातूर-टेंभुर्णी महामार्गासाठी ७९ कोटी

googlenewsNext

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रास जोडणारा मुख्य मार्ग असलेला टेंभुर्णी-कुर्डुवाडी-बार्शी-येडशी हा एक प्रमुख मार्ग आहे. हा महामार्ग लातूर, उस्मानाबाद व सोलापूर या जिल्ह्यांनाही जोडतो. या महामार्गाच्या १६३ किमी पैकी १०१ किमी अंतर हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून जाते. या महामार्गाची स्थिती वाहतुकीस अनुकूल नसल्याने टेंभुर्णी-बार्शी मार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत होते. या अनुषंगाने आपण

२९ सप्टेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लातूर-मुरुड-ढोकी-येडशी-कुर्डुवाडी-टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्गासाठी निधी देण्याची मागणी केली होती. तसेच २१ नोव्हेंबर २०१९ रोजी तारांकित प्रश्नही संसद अधिवेशनात उपस्थित केला होता. ९ मार्च रोजीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही या रस्त्याकडे लक्ष वेधले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश आले असून, लातूर-मुरुड-ढोकी-येडशी-कुर्डुवाडी-टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्गासाठी ४९ कोटी १२ लाख तर बार्शी-येडशी-मुरुड-लातूर-उदगीर-सगरोळी या महामार्गासाठी ३० कोटी २४ लाख, असे एकूण ७९ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी सांगितले.

Web Title: 79 crore for Latur-Tembhurni highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.