विद्यापीठ उपकेंद्रात होताहेत ८ कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:32 AM2021-03-26T04:32:34+5:302021-03-26T04:32:34+5:30

उस्मानाबाद : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात ८ कोटी रुपयांची विकासकामे होऊ घातली आहेत. त्याचा निधी मंगळवारी सिनेट ...

8 crore works are being done in the university sub-center | विद्यापीठ उपकेंद्रात होताहेत ८ कोटींची कामे

विद्यापीठ उपकेंद्रात होताहेत ८ कोटींची कामे

googlenewsNext

उस्मानाबाद : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात ८ कोटी रुपयांची विकासकामे होऊ घातली आहेत. त्याचा निधी मंगळवारी सिनेट सदस्य संजय निंबाळकर यांनी बांधकाम विभागाकडे सुपूर्द केला. आता खर्या अर्थाने उपकेंद्राची वाटचाल विद्यापीठाच्या दिशेने सुरु झाल्याची प्रतिक्रिया निंबाळकर यांनी यावेळी दिली.

उपकेंद्र परिसरात विज्ञान इमारतीसाठी ४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच उपगृहासाठी ८० लाख, विश्रामगृहासाठी १ कोटी ८५ लाख मंजूर आहेत. अंतर्गत रस्त्यांसाठी ५० लाख मंजूर होऊन त्याचे कामही सुरु झालेले आहे. याशिवाय, परिसरात ५ हजार वृक्षांची लागवड करुन त्यांचे ठिबक सिंचनद्वारे संगोपन करण्यासाठी १४ लाख रुपयांचा निधी खर्ची घातला गेला आहे. मुलींच्या वसतिगृह अधीक्षकांच्या निवासस्थानासाठी ११ लाख रुपये खर्च करण्यात आले. तर कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजनेसाठी २५ लाख रुपये मंजूर झाले असून, लवकरच त्याचेही काम सुरु करण्यात येत आहे. भूमी व जलव्यवस्थापन विभागातील पाणी व माती परिक्षणासाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रीसाठी ३० लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती संजय निंबाळकर यांनी दिली. दरम्यान, हा निधी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सगर यांच्याकडेसुपूर्द करण्यात आला. यावेळी उपकेंद्राचे संचालक डी.के. गायकवाड, प्रा.दीक्षित, उपकुलसचिव कर्हाळे, अभियंता आळंगे, धनराज सोमवंशी, नाना जमदाडे, महेश पडवळ, वाजीद पठाण, बिलाल शेख, असद पठाण, अतिक शेख उपस्थित होते.

Web Title: 8 crore works are being done in the university sub-center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.