पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर दुकान फोडले; ५ लाखांची कृषी अवजारे चोरट्यांनी पळवली

By चेतनकुमार धनुरे | Updated: September 23, 2022 15:38 IST2022-09-23T15:37:57+5:302022-09-23T15:38:26+5:30

परांडा पोलीसांकडून रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे. असे असतानाही पोलिसांच्या नाकावर टिच्चून झाली चोरी.

A shop was broken near within a stone's throw of the police station; Thieves stole agricultural implements worth 5 lakhs | पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर दुकान फोडले; ५ लाखांची कृषी अवजारे चोरट्यांनी पळवली

पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर दुकान फोडले; ५ लाखांची कृषी अवजारे चोरट्यांनी पळवली

परंडा (जि. उस्मानाबाद) : अज्ञात चोरट्यानी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका मशिनरी स्टोअर्सचे शटर उचकटून सुमारे ५ ते ६ लाख रुपये किंमतीचे कृषी यंत्र साहित्य  चोरून नेले. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे.

परांडा पोलीसांकडून रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे. असे असतानाही चोरट्याने पोलिसांच्या नाकावर टिच्चून पोलीस ठाण्याच्या काही अंतरावरील मुख्य मार्गावर असलेल्या ऋषिकेश मशनरी स्टोअर्सचे मुख्य शटर उचकून मध्यरात्री १.१५ वाजता दुकानात  प्रवेश केला. तब्बल साडेतीन तास चोरटा दुकानात होता. दरम्यानच्या काळात चोरट्याने तांब्याची वायर, विद्युत पंप, मोटारीचे स्पेअर पार्ट, किट, किट बॉक्स व एलसीडी टीव्ही आदी पाच ते सहा लाखाचे साहित्य लंपास केले. यानंतर चोरटा पहाटे ४.५० वाजता सामानासह दुकानाबाहेर पडला. 

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सकाळी चोरी झाल्याची घटना उघडकीस येताच पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे, सहाय्यक निरीक्षक कविता मुसळे, शबाना मुल्ला, मनोज यादव यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे अद्याप चोरीच्या गुन्ह्याची नोंद झालेली नाही.

Web Title: A shop was broken near within a stone's throw of the police station; Thieves stole agricultural implements worth 5 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.