दीड हजारावर शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:35 AM2021-09-25T04:35:01+5:302021-09-25T04:35:01+5:30
शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील एकूण ७२ हजार ९६२ लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. ...
शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील एकूण ७२ हजार ९६२ लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी ७१ हजार २९० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण असून ७० हजार ३१८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर ५०८ कोटी ९८ लाख रुपये रक्कम जमा करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही अशा शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे व योजनेचा लाभ घ्यावा. तसेच, आधार प्रमाणीकरण प्रक्रियादरम्यान कर्जखाते रकमेत कोणतीही तफावत असल्यास ‘रक्कम अमान्य’ हा पर्याय उपयोगात आणण्यापूर्वी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून कर्जरकमेची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व जिल्हा उपनिबंधक सरकारी संस्था उस्मानाबाद यांनी केले आहे.