मणिपूरमधील महिला अत्याचाराविरोधात आपची धाराशिवमध्ये निदर्शने

By सूरज पाचपिंडे  | Published: July 21, 2023 06:21 PM2023-07-21T18:21:59+5:302023-07-21T18:22:27+5:30

खटला फास्ट ट्रक कोर्टात चालविण्याची मागणी

AAP protests in Dharashiv against women oppression in Manipur | मणिपूरमधील महिला अत्याचाराविरोधात आपची धाराशिवमध्ये निदर्शने

मणिपूरमधील महिला अत्याचाराविरोधात आपची धाराशिवमध्ये निदर्शने

googlenewsNext

धाराशिव : मणिपूरमधील महिलांवरील अत्याचार, हत्या याविरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने शुक्रवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मणिपूर सरकारचा निषेध नोंदवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

मणिपूरमधील दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे देशभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. धाराशिव शहरातही शुक्रवारी आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली. यावेळी केंद्रातील भाजप सरकार व मणिपूर सरकाचा निषेध नोंदवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मणिपूरमधील चिघळलेली परिस्थिती तेथील सरकारने अद्याप नियंत्रणात आणली नाही. यात १४० हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. केंद्र सरकारने लवकरच मणिपूरची परिस्थिती नियंत्रणात आणावी, महिलांवरील अत्याचाराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना कडक शिक्षा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती. आंदोलनात आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सदस्य अजित खोत, जिल्हा संयोजक राहुल माकोडे, जिल्हा सचिव मुन्ना शेख, प्रा. चांद शेख, सहसचिव अभिजित देवकुळे, शहराध्यक्ष बिलाल रझवी, उपाध्यक्ष संजय दनाने आदी उपस्थित होते.

Web Title: AAP protests in Dharashiv against women oppression in Manipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.