तूर कापणीच्या कामाला आली गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:27 AM2020-12-23T04:27:41+5:302020-12-23T04:27:41+5:30
धनराज बिराजदार यांचा सत्कार जेवळी : येथील धनराज बिराजदार यांची संभाजी ब्रगेडच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाली. याबद्दल जिल्हाध्यक्ष औड. ...
धनराज बिराजदार यांचा सत्कार
जेवळी : येथील धनराज बिराजदार यांची संभाजी ब्रगेडच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाली. याबद्दल जिल्हाध्यक्ष औड. तानाजी चौधरी यांच्या हस्ते बिराजदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका उपाध्यक्ष किरण सोनकांबळे, सचवि बालाजी यादव, कोषाध्यक्ष अविनाश मुळे, तालुका संघटक प्रणील सूर्यवंशी, दौलत पवार, विठ्ठल औरादे आदी उपस्थित होते.
सुरळीत वीज पुरवठा देण्याची मागणी
कळंब : यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न मिळेल, या आशेवर रबीची पेरणी केली. या पिकांना सध्या पाण्याची गरज असताना सुरळीत वीज मिळत नसल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे महावितरणने सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी तालुक्यातील भाटसांगवी, सात्रा, खोंदला येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. एक दिवसाआड वीज उपलब्ध होत असल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
विद्यार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान
नळदुर्ग : राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील रासेयो विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबविले. यावेळी प्राचार्य संजय कोरेकर, एस. एस. शिंदे, प्रा.एस. एस. राठोड, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. निलेश शेरे, प्रा. डॉ. रोहिणी महिंद्रकर, प्रा. महेंद्र भालेराव, प्रा. शिवाजी घोडके आदी उपस्थित होते.
पुलावर भगदाड; अपघाताची शक्यता
उमरगा : उमरगा ते एकोंडी या रस्त्यावरील ओढ्यावर असलेल्या पुलावर सध्या मधोमध मोठे भगदाड पडले आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी हे भगदाड दिसून नाही आल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.
------------
कर भरणा वाढला
(पैशांचा फोटो)
तुळजापूर : बुधवारपासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात होत असून, या अनुषंगाने सध्या उमेदवार कागदपत्रांची जमवाजमव करीत आहेत. दरम्यान, यानिमित्ताने ग्रामपंचायतीकडे कर भरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.
रस्ता नादुरुस्त
(फाईल फोटो घेणे)
लोहारा : लोहारा ते मोघा (बु) या चार किमीच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, यामुळे वाहनधारक त्रस्त आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी श्रीकांत पाटील यांनी केली आहे.
काठीची मिरवणूक
तुळजापूर : तालुक्यातील बारूळ येथे भंडाऱ्याची उधळण करीत श्री खंडोबाच्या काठीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी योगेश वट्टे, दत्ता वट्टे, शिवाजी मुदगुडे यांच्यासह वारूवाले व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोंढे यांचा सत्कार
तुळजापूर : राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी दररोज पुतळा परिसराची स्वच्छता करणारे पालिकेचे कर्मचारी दत्ता लोंढे यांचा सत्कार करण्यात आला.
चाचणी सुरू
उमरगा : येथील कै. शरणाप्पा मलंग विद्यालयात पालक व विद्यार्थ्यांच्या संमतीनंतर दहावीच्या पहिल्या सराव चाचणी परीक्षेस मैदानावर सुरूवात झाली. यात १५२ विद्यार्थी उपस्थित आहेत. यावेळी कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.