साडी दुचाकीच्या चाकात अडकल्याने अपघात; सणाच्या खरेदीसाठी जाणाऱ्या महिलेचा मृत्यू

By बाबुराव चव्हाण | Published: September 2, 2022 06:24 PM2022-09-02T18:24:36+5:302022-09-02T18:25:37+5:30

शहरातील एका ‘मॉल’मधून गौरी-गणपतीच्या सणासाठी लागणाऱ्या काही साहित्यांची खरेदी करायचे नियोजन केले होते.

Accident due to sari caught in wheel of bike; Woman dies while going for festive shopping with husband | साडी दुचाकीच्या चाकात अडकल्याने अपघात; सणाच्या खरेदीसाठी जाणाऱ्या महिलेचा मृत्यू

साडी दुचाकीच्या चाकात अडकल्याने अपघात; सणाच्या खरेदीसाठी जाणाऱ्या महिलेचा मृत्यू

googlenewsNext

कळंब (जि. उस्मानाबाद) -उस्मानाबाद येथील एका ‘मॉल’मध्ये सणासाठी लागणारे काही साहित्य खरेदी करण्याकरिता पती समवेत दुचाकीवरून जात असलेल्या आंदोरा येथील एका ४७ वर्षीय गृहिणीचा दुचाकीवरून पडल्याने जागीच मृत्यू झाला. हा अपघात दुचाकीच्या मागच्या चाकात साडी अडकल्याने झाला आहे.

कळंब तालुक्यातील आंदोरा येथील पांडूरंग बाबासाहेब बावणे यांच्या पत्नी राजश्री (वय ४७) यांनी मागच्या तीन -चार दिवसांपासून उस्मानाबाद शहरातील एका ‘मॉल’मधून गौरी-गणपतीच्या सणासाठी लागणाऱ्या काही साहित्यांची खरेदी करायचे नियोजन केले होते. यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पांडूरंग बाबासाहेब बावणे व राजश्री पांडूरंग बावणे हे दांपत्य दुचाकीवरून येरमाळामार्गे उस्मानाबादच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, शेगाव-पंढरपूर मार्गावरील परतापूर ते उमरा गावाच्या दरम्यान दुपारी साडेअकराच्या सुमारास पांडूरंग बावणे हे दुचाकी चालवत असताना, मागे बसलेल्या पत्नी राजश्री यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या चाकात अडकला.

काही कळायच्या आतच राजश्री या रस्त्यावर कोसळल्या. मात्र, साडी चाकात अडकल्यामुळे त्या दुचाकीच्या मागे फरफटत गेल्या. यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होवून जखमी झालेल्या राजश्री यांना उपचारार्थ हलवण्यासाठी रूग्णवाहिका दाखल झाली, मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. ऐन सणासुदीच्या तोंडावर हा दुर्दैवी प्रकार घडल्याने गावात, पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Accident due to sari caught in wheel of bike; Woman dies while going for festive shopping with husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.