३० लाखांच्या रोकडसह एटीएम मशीन पळवणारे पकडले, पोलिसांचे हलगी लावून जंगी स्वागत
By चेतनकुमार धनुरे | Published: September 5, 2023 03:43 PM2023-09-05T15:43:00+5:302023-09-05T15:45:47+5:30
कळंबकरानी आरोपी शहरात घेऊन येताच तपास पथकाचे हलगी लावून वाजत गाजत स्वागत केले.
कळंब (धाराशिव) : मागील बुधवारी पहाटे कळंब येथे एसबीआय बँकेच्या २९ लाख ९१ हजाराची रोकड असलेल्या एटीएम मशीनवर चोरट्यांनी डल्ला मारला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याचा छडा लावला असून सहा दिवसांत आरोपीना ताब्यात घेतले आहे. यानंतर कळंबकरानी आरोपी शहरात घेऊन येताच तपास पथकाचे हलगी लावून वाजत गाजत स्वागत केले.
कळंब येथील एसबीआय बँकेचे ढोकी रोडवरील एका कॉम्प्लेक्समध्ये एटीएम सेंटर होते. वर्दळीच्या अशा या रस्त्यावरील एटीएमवर बुधवारी पहाटे डल्ला मारत केवळ रोकडच नव्हे तर २९ लाख ९१ हजार रूपयाची रोकड असलेली एटीएम मशीनच लंपास केली होती.
३० लाखांच्या रोकडसह एटीएम पळवणाऱ्या चोरांचा लावला छडा,
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) September 5, 2023
कळंब पोलिसांचे हलगी लावून जंगी स्वागत #CrimeNewspic.twitter.com/T8Utrvngoc
यानंतर विविध पथके रवाना करत तपासकार्य सुरू होते. अखेर पोलिसांना या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. जालना जिल्हातील परतूर येथून सदर आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले आहे.