३७४ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:29 AM2021-02-15T04:29:07+5:302021-02-15T04:29:07+5:30
जुगार अड्ड्यावर छापे; दोघांविरुद्ध गुन्हा उस्मानाबाद : उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने १३ फेब्रुवारी येडशी व घाटंग्री तांडा येथील ...
जुगार अड्ड्यावर छापे; दोघांविरुद्ध गुन्हा
उस्मानाबाद : उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने १३ फेब्रुवारी येडशी व घाटंग्री तांडा येथील जुगार अड्ड्यावर छापे टाकले. येडशी येथील अमर शिंदे याच्याजवळ मुंबई मटका जुगार साहित्य व १४७० रुपये आढळून आले, तर घाटंग्री तांडा येथील नितीन राठोड याच्याजवळ कल्याण मटका जुगार साहित्य व ७२० रुपये आढळून आले. पोलीस पथकाने जुगार साहित्य व रक्कम जप्त करून संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद केला.
कळंब येथे दारू अड्ड्यावर धाडी
उस्मानाबाद : कळंब पोलीस ठाण्याच्या पथकाने शहरातील इंदिरानगर भागातील दोन दारू अड्ड्यांवर धाडी टाकल्या. यात ललिता काळे व मीरा काळे यांच्याजवळ प्रत्येकी दहा लीटर गावठी दारू कॅनमध्ये आढळून आली. पोलिसांनी दारू जप्त करून संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले.
सांगवी (पाट) येथून विद्युतपंप चोरला
उस्मानाबाद : शेतातील विहिरीतील पाणबुडी विद्युतपंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी भूम तालुक्यातील सांगवी (पाट) येथे घडली. सांगवी (पाट) येथील अंगद वाघ यांचे शेत आहे. या शेतातील विहिरीतील पाच अश्वशक्ती क्षमतेची पाणबुडी पंप चोरट्यांनी चोरून नेला. पंप चोरी गेल्याचे समजताच वाघ यांनी भूम पोलीस ठाण्यात पाणबुडी विद्युतपंप चोरीची फिर्याद दिली. यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला.