चालकाविरूद्ध उगारला कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:36 AM2021-08-28T04:36:39+5:302021-08-28T04:36:39+5:30
कार्यालय फाेडले, पैसे लंपास उस्मानाबाद - शहरातील बालाजीनगर येथील मंथन मैरान यांचे ओमनगर भागात वित्त व्यवस्था कार्यालय आहे. या ...
कार्यालय फाेडले, पैसे लंपास
उस्मानाबाद - शहरातील बालाजीनगर येथील मंथन मैरान यांचे ओमनगर भागात वित्त व्यवस्था कार्यालय आहे. या कार्यालयाचे शटर उचकटून अज्ञाताने आतील स्टेशनरी असलेले लाेखंडी कपाट तसेच राेख २५ हजार रूपये लंपास केले. ही घटना २५ ते २६ ऑगस्ट या कालावधीत घडली. या प्रकरणी अज्ञाताविरूद्ध उस्मानाबाद ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाेकादायकरीत्या अग्नी प्रज्वलित करणे भाेवले
उस्मानाबाद -उमरगा तालुक्यातील कसगी येथील संताेष बाेरूटे यांनी आपल्या ताब्यातील गाड्यावर धाेकादायकरित्या अग्नी प्रज्वलित केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. सदरील प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उमरगा यांनी बाेरूटे यांना ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
जुगारअड्ड्यावर छापा, गुन्हा दाखल
उस्मानाबाद -कळंब येथील बाजार समितीच्या मैदानातील जुगारअड्ड्यावर पाेलिसांनी अचानक छापा मारला. या कारवाईत पाेलिसांनी जुगाराच्या साहित्यासह राेख रक्कम जप्त केली. या प्रकरणी महेबूब अत्तार यांच्याविरूद्ध कळंब पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.