पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही, मास्क व फिजिकल डिस्टंसिंग हाच पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:49 AM2021-02-23T04:49:07+5:302021-02-23T04:49:07+5:30
कोट... धोका वाढतोय जिल्ह्यातील मागील पाच ते सहा दिवसापासून रुग्ण संख्या वाढू लागली आहे. १६ फेब्रुवारी १२ रुग्ण आढळून ...
कोट...
धोका वाढतोय
जिल्ह्यातील मागील पाच ते सहा दिवसापासून रुग्ण संख्या वाढू लागली आहे. १६ फेब्रुवारी १२ रुग्ण आढळून आले होते. १७ फेब्रुवारी १७ रुग्णांची भर पडली.
१८ फेब्रुवारी २५, १९ फेब्रुवारी १५, २० फेब्रुवारी रोजी १९ रुग्ण तर २१ फेब्रुवारी २४ रुग्णांची भर पडली.
प्रतिक्रिया...
मागील काही दिवसापासून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. प्रसार रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे. प्रशासनने कोरोना प्रतिबंधासाठी कडक नियम लागू करावेत.
संतोष शेटे, उद्योजक
लॉकडाऊन काळात बांधकाम व्यवसाय दोन महिने ठप्प झाला. त्यामुळे बांधकामे अपूर्ण राहिले होते तसेच मोठ्या प्रमाणावर मजूरांचे स्थलांतरही झाले होते. त्यानंतर कोविड नियमांचे पालन करुन बांधकाम सुरु करण्यास परवानगी दिल्याने बांधकाम व्यवसाय सुरु आहे. मजूरांच्या हाताला काम मिळत आहे. शासनाने नियम कडक करावा मात्र लॉकडाऊन लागू करु नये.
राहुल माकोडे, सचिव, क्रिडाई संघटना
कोरोनाच्या लॉकडाऊमुळे उद्योगांना फटका बसला आहे. मागील काही महिन्यापासून उद्योग पूर्वपदावर येऊ लागले आहेत. मात्र, पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. कोविड प्रतिबंधासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. त्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊन ऐवजी नियम कडक करावेत.
सुनिल गर्जे, लघु भारती अध्यक्ष