कडदोरा येथे ‘उमेद’ अंतर्गत कृषी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST2021-07-09T04:21:27+5:302021-07-09T04:21:27+5:30

उमरगा : तालुक्यातील कडदोरा येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बुधवारी कृषी मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच ...

Agriculture meet under 'Umed' at Kaddora | कडदोरा येथे ‘उमेद’ अंतर्गत कृषी मेळावा

कडदोरा येथे ‘उमेद’ अंतर्गत कृषी मेळावा

उमरगा : तालुक्यातील कडदोरा येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बुधवारी कृषी मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच सुनंदाताई रणखांब तर प्रमुख पाहुणे म्हणून पं. स. सभापती सचिन पाटील, उमेद कृषी व्यवस्थापक किशोर औरादे, उपसरपंच खंडू बालकुंदे, तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप पाटील आदी उपस्थित होते. सभापती पाटील यांनी पंचायत समितीच्या विविध योजनांची माहिती दिली. कृषी व्यवस्थापक किशोर औरादे यांनी उमेदच्या पोषण परसबाग विकसन मोहिम, झिरो बजेट शेती, सेंद्रिय प शेती, गांडूळ खत, निंबोळी अर्क , दशपर्णी अर्क, जैविक कीड नियंत्रण ,उत्पादक गट, बांधावर व सलग वृक्ष लागवड आदी बाबत सविस्तर माहिती दिली. उपसरपंच खंडू बालकुंदे यांनी शासनाच्या विविध योजनांचा फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन संगणक परिचालक प्रशांत चव्हाण यांनी केले तर आभार माजी सैनिक रमेश मुगळे यांनी मांडले. कार्यक्रमासाठी बालाजी धनराज रणखांब, बालाजी शहाजी रणखांब , सी.आर.पी. वैशाली चव्हाण, कृषी सखी कांचन हिंगमिरे व शिवकन्या महिला ग्राम संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Agriculture meet under 'Umed' at Kaddora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.