ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी झाला, साखर महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:38 AM2021-08-14T04:38:09+5:302021-08-14T04:38:09+5:30
उस्मानाबाद : श्रावण सुरू झाल्याने या महिन्यात असलेल्या सणांमुळे साखरेची मागणी वाढते. एकीकडे मागणी वाढली असली तरी साखरेच्या प्रतिकिलो ...
उस्मानाबाद : श्रावण सुरू झाल्याने या महिन्यात असलेल्या सणांमुळे साखरेची मागणी वाढते. एकीकडे मागणी वाढली असली तरी साखरेच्या प्रतिकिलो दरामध्ये २ रुपयाने वाढ झाली आहे. त्यामुळे सणासुदीचा गोडवा कमी झाल्याचे दिसून येते. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये साखरचे दर वाढत असतात. मात्र, कोरोना संसर्गामुळे बाजार बंद होते. त्यामुळे दिवाही, संक्रांतीतही दर स्थिरच होते. मात्र, श्रावण महिन्यात साखरे दोन रुपयाने महागली आहे.
का वाढले भाव
लॉकडाऊनकाळात दुकानांसाठी वेळ निश्चित केली होती शिवाय, कोल्ड्रिंग्स दुकाने, हॉटेलही बंद होती. परिणामी, साखरेस मागणी कमी होती. त्यामुळे दरही स्थिर राहिले होते. श्रावण महिन्यात सण आले आहेत. त्यामुळे साखरेस मागणी वाढली. त्यामुळे दरही वाढले आहेत.
- अमित भराटे, व्यापारी
कोरोनाच्या संसर्गामुळे व्यवसाय बंद होते. शिवाय, हॉटेल बंद हेाते. त्यामुळे साखरेस मागणी कमी होती. त्यामुळे जानेवारी ते जुलै महिन्यात साखरेचे दर स्थिरच होते. निर्बंध शिथील करण्यात आल्याने व्यवसाय सुरू झाले. सणासाठी साखर खरेदी केली जात आहे. त्यामुळे साखरेचे दर १ ते २ रुपयाने वाढले आहेत.
अमित गांधी, व्यापारी
साखरेचे दर
जानेवारी ३३
फेब्रुवारी ३३
मार्च ३३
एप्रिल ३३
मे ३३
जून ३३
जुलै ३३
ऑगस्ट ३५
महिन्याचे बजेट वाढले
पेट्रोल, डिझेल, सिलिंडर गॅसच्या दरात प्रतिदिन वाढ होत चालली आहे. त्यासोबतच खाद्यतेलाच्या दरातही वाढ होत आहे. आता साखरही महाग झाली आहे. त्यामुळे महिन्यासाठी लागणारे खर्च वाढला आहे.
सुनीता क्षीरसागर, गृहिणी
कोरोनाकाळात घर चालविणे कठीण झाले आहे. हाताला काम नाही त्यातच आता महागाई वाढत आहे. खाद्यतेलाच्या दरासोबतच साखरचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहे. शासनाने दरावर नियंत्रण ठेवावे.
नंदिनी भोसले, गृहिणी