खाजगी शिकवणी सुरू करण्यास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:20+5:302021-06-30T04:21:20+5:30
उस्मानाबाद : कोरोना प्रादुर्भाच्या दुसऱ्या लाटेमुळे व संभाव्य येणाऱ्या तिसऱ्या लाटेमुळे शाळा चालू होण्याची शक्यता धूसर दिसत आहे. त्यामुळे ...
उस्मानाबाद : कोरोना प्रादुर्भाच्या दुसऱ्या लाटेमुळे व संभाव्य येणाऱ्या तिसऱ्या लाटेमुळे शाळा चालू होण्याची शक्यता धूसर दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निर्माण होणाऱ्या शैक्षणिक शंका निरसनासाठी खासगी शिकवणी वर्गास मान्यता द्यावी, अशी मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मागील वर्षभरापासून चालू असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या बंद आहेत. ऑनलाईन शिक्षणपद्धतीच्या माध्यमातून सध्या विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू आहे. पहिल्या लाटेमुळे मागील वर्षी प्रत्यक्षात शिक्षणव्यवस्था ही चाललीच नाही. यावर्षीदेखील दुसऱ्या लाटेमुळे शाळा, महाविद्यालये चालू होऊ शकले नाहीत. त्यामुळे केवळ ऑनलाईन पद्धतीवर विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रिया समजून घ्यावी लागत आहे. ऑनलाईन पद्धतीमुळे तांत्रिकदृष्ट्या विद्यार्थी अभ्यास करून पुढच्या वर्गात जातीलही; परंतू, त्यांच्या बौद्धिक विकासाचा प्रश्न ही मोठी समस्या निर्माण होत आहे, त्यामुळे खासगी शिकवणी चालकांना मर्यादित क्षमतेनुसार कोरोनाच्या नियम, अटी व शासनाने दिलेले आरोग्याचे निर्देश पाळून शहर व जिल्ह्यातील खासगी शिकवणीधारकांना शिकवणी वर्ग चालू करण्यास मान्यता दिल्यास विद्यार्थ्यांचा निर्माण होणारा बौद्धिक विकासाचा प्रश्न सुटण्यास काही अंशी मदत होईल, असे कुलकर्णी यांनी पत्रात नमूद केले आहे.