सेंद्रिय शेती सेवा केंद्रातून रासायनिक खताला पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:09+5:302021-06-30T04:21:09+5:30
लोहारा : उमेदच्या सेंद्रिय शेती सेवा केंद्राच्या माध्यमातून रासायनिक खताला पर्याय म्हणून सेंद्रिय निविष्ठा हा चांगला पर्याय उपलब्ध होत ...
लोहारा : उमेदच्या सेंद्रिय शेती सेवा केंद्राच्या माध्यमातून रासायनिक खताला पर्याय म्हणून सेंद्रिय निविष्ठा हा चांगला पर्याय उपलब्ध होत असल्याचे मत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांनी व्यक्त केले.
बेंडकाळ येथील कृषी सखी लक्ष्मी मोरे यांनी सुरु केलेल्या उमेद सेंद्रिय शेती सेवा केंद्रास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. सदर केंद्राच्या माध्यमातून कीड व रोग नियंत्रणासाठी सेंद्रिय निविष्ठा, दशपर्णी अर्क, जीवामृत, वेस्ट डी कंपोजर, अग्निअस्त्र, व्हर्मी वॉश, गांडूळ खत आदी सेंद्रिय निविष्ठांचा वापर कसा करावा, याची माहिती देण्यात येणार आहे. सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होत आहे. याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच तालुक्यात सेंद्रिय शेतीसाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन नवाळे यांनी केले.
नवाळे यांनी बेंडकाळ येथील सेंद्रिय शेती निविष्ठा सेवा केंद्रालाही भेट दिली. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले, सहायक गटविकास अधिकारी संजय ढाकणे, तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार, तालुका समन्वयक नरेंद्र गवळी, प्रभाग समन्वयक सौरभ जगताप, कृषी सखी लक्ष्मी मोरे आदी उपस्थित होते.
चौकट......
तालुक्यात २० गट स्थापन
तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत सन २०१९-२०२० पासून गटातील महिला शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती अभियान चालू आहे. या अंतर्गत आजपर्यंत तालुक्यातील २७ गावामध्ये २० सेंद्रिय गट स्थापन झाले असून, हे गट सेंद्रिय शेती करत आहेत. सदर सेंद्रिय शेती करणाऱ्या अभियानातील -------------- अपूर्ण