वादळाच्या तडाख्यात पत्र्यावरील दगड डोक्यात पडल्याने वृद्धाचा मृत्यू

By चेतनकुमार धनुरे | Published: May 27, 2024 06:30 PM2024-05-27T18:30:30+5:302024-05-27T18:30:54+5:30

याबाबत बेंबळी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

An old man died after a stone fell on his head during the storm | वादळाच्या तडाख्यात पत्र्यावरील दगड डोक्यात पडल्याने वृद्धाचा मृत्यू

वादळाच्या तडाख्यात पत्र्यावरील दगड डोक्यात पडल्याने वृद्धाचा मृत्यू

समुद्रवाणी (जि.धाराशिव) : अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाल्याने वर ठेवलेला दगड डोक्यात पडून गंभीर जखमी झालेल्या एका ९० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना धाराशिव तालुक्यातील सांगवी येथे रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सांगवी येथील हनुमंत अर्जुन कोळपे रविवारी रात्री आपल्या घरात होते. रात्री गावपरिसरात सोसाट्याचा वारा सुटला होता. यातच ९:३० वाजण्याच्या सुमारास कोळपे यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्यात उडाले. यावेळी पत्र्यावर ठेवलेला एक दगड हनुमंत कोळपे यांच्या डोक्यात पडला. या घटनेत गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. उपचारासाठी त्यांना समुद्रवाणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

याबाबत बेंबळी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंडळ अधिकारी पाडोळीचे (आ) कोळी, कामेगाव सज्जाचे तलाठी निंबाळकर व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यरात्री घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.

Web Title: An old man died after a stone fell on his head during the storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.