रस्त्यावर वाहने उभी करणे आले अंगलट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:46 AM2021-02-26T04:46:17+5:302021-02-26T04:46:17+5:30
उस्मानाबाद : सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध पोलिसांच्या वतीने धडक मोहीम राबविली जात ...
उस्मानाबाद : सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध पोलिसांच्या वतीने धडक मोहीम राबविली जात आहे. बुधवारी जिल्ह्यातील विविध ठिकाणी ५ वाहनचालकांवर गुन्हे नोंद करण्यात आले. येणेगूर येथील रमेश सुतार व उमरगा येथील लखन जाधव यांनी आपआपल्या ताब्यातील रिक्षा उमरगा बसस्थानकासमोरील महामार्गावर उभे केल्याचे उमरगा पोलीस ठाण्याच्या पथकास आढळून आले. या वाहनचालकांवर उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथील धनंजय माने यांनी त्यांचे पिकअप वाहन येडशी येथील महामार्गावर उभा केल्याचे उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकास निर्दशनास आले. यावरून संबंधिताविरुद्ध उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. परंडा येथील सखाराम जाधव यांनी त्यांचे पिकअप वाहन वारदवाढी चौकातील रस्त्यावर उभे केल्याचे परंडा पोलिसांस आढळून आले. या वाहनचालकावर परंडा ठाण्यात गुन्हा नोंद झाला. नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना त्यांना नळदुर्ग येथील भीमाशंकर घोडके हे त्यांच्या चारचाकी वाहनातून बोर आलेल्या अवस्थेत लोखंडी सळयांची वाहतूक करताना आढळून आले. या वाहनचालकावर नळदुर्ग ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.